.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
ज्येष्ठ साहित्यिक, समाजसेवक आणि शिक्षणतज्ज्ञ डॉ. हरिश्चंद्र तुकाराम नागवेकर (८३) यांचे आज सकाळी अल्प आजाराने दुःखद निधन झाले. डॉ. नागवेकर हे झुआरीनगर येथील 'एमईएस' महाविद्यालयाचे माजी प्राचार्य; तर 'गोमन्त कालिका' या मासिकाचे ते संपादक होते.
गेले काही दिवस डॉ. नागवेकर यांची प्रकृती खालावल्याने त्यांना इस्पितळात दाखल करण्यात आले होते. मात्र, तब्येत अधिकच खालावल्याने त्यांना घरी आणण्यात आले होते. आज सोमवार, २९ जुलै रोजी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास त्यांचे निधन झाले.
सायंकाळी त्यांच्या पार्थिवावर मडगावच्या मठग्रामस्थ हिंदू स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी कुंदा, विवाहित कन्या शिल्पा सुनील रायकर व दीपा संतोष लोटलीकर तसेच नातवंडे असा परिवार आहे.
डॉ. नागवेकर यांचा दैनिक 'गोमन्तक' शीही संबंध होता. माधवराव गडकरी हे 'गोमन्तक'चे संपादक असताना डॉ. नागवेकर उपसंपादक म्हणून काम करत होते. डॉ. नागवेकर यांच्या निधनाची बातमी पसरताच साहित्यिक, शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी त्यांच्या कोंब-मडगाव येथील घरी जाऊन पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले.
नागवेकर यांचा जन्म प्रसिद्ध नागवेकर (मुंबईकर) या पारंपरिक सोनार कुटुंबात १० मार्च १९४१ रोजी झाला. त्यांनी आपले बीए व एमए अर्थशास्त्रातील शिक्षण मुंबई विद्यापीठातून केले व अर्थशास्त्र विषयात त्यांनी डॉक्टरेट पदवी प्राप्त केली.
ते अर्थशास्त्राचे गाढे अभ्यासक होते. एमईएस महाविद्यालयात त्यांनी ३१ वर्षे अर्थशास्त्राचे व्याख्याते म्हणून काम केले आणि याच महाविद्यालयातून ते प्राचार्य म्हणून ते निवृत्त झाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.