Hyderabad Lit Fest : हैद्राबाद लिटरेचर फेस्टिव्हलमध्ये कोकणी भाषेचा गौरव; मिळाला 'हा' मान

उद्यापासून सुरुवात, दामोदर मावजो उद्घाटक
Hyderabad Lit Fest
Hyderabad Lit FestDainik Gomantak
Published on
Updated on

Hyderabad Lit Fest : साहित्य आणि कला या क्षेत्रातील देशातील प्रतिष्ठेचा महोत्सव मानला जाणरा 'हैद्राबाद लिटररी फेस्टिवल' या तीन दिवसांच्या महोत्सवाला 27 जानेवारी पासून सैफाबाद हैद्राबाद येथे सुरुवात होत असून यावेळी पहील्यांदाच या महोत्सवात कोकणीला 'प्रकाश झोतातील भाषा' होण्याचा मान मिळाला आहे.

ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ज्येष्ठ कोकणी लेखक दामोदर मावजो यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन केले जाणार आहे. देश विदेशातील अनेक साहित्यीक आणि कलाकार यांचा सामावेश असलेल्या या तीन दिवसांच्या महोत्सवात मावजो यांच्या व्यतिरिक्त प्रसिद्ध कोकणी सिने निर्माते बाडरॉय बार्रेटो आणि गोव्यातील प्रसिद्ध आर्किटेक्टआणि लेखिका प्रिता सरदेसाई हे भाग घेणार आहेत.

Hyderabad Lit Fest
President's Police Medal : गोव्याच्या चार पोलिस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पोलिस पदक

कोकणी सिनेमाशी संबंधित असलेले मुंबईस्थित छायाचित्रकार सलील चतुर्वेदी आणि कोकण येथील कावी कलेवर अभ्यास केलेल्या चित्रकारनिर्मला शेणोय हे कोकणी प्रतिनिधी म्हणून सहभागी होणार आहे.

या, प्रतिष्ठेच्या महोत्सवात पहील्यांदाच कोकणी भाषेची गंभीरपणे दखल घेतली जात आहे ही अत्यंत महत्त्वाची बाब अशी प्रतिक्रीया उद्घाटक मावजो यांनी व्यक्त केली. कोकणी भाषेची व्याप्ती आणि तिच्या समोरील आव्हाने या विषयावर होणाऱ्या परिसंवादात मावजो यांचे बीजभाषण होणार असून वरील सर्व वक्ते त्यात सहभागी होणार आहेत. या महोत्सवात मावजो यांचे कथाकथनही होणार आहे.

Hyderabad Lit Fest
Mahadayi Water Dispute: मोठ्या भावाची दमदाटी खपवून घेतली जाणार नाही; सरदेसाईंचा बोम्मईंना ईशारा

गोव्यातील लोककला आणि लोकनृत्य या विषयावरील अभ्यासक असलेल्या सरदेसाई यांचेही 'गोव्यातील फुगडी व धालो' या विषयावर भाषण होणार असून यावेळी सत्तरी तालुक्यातील ध्यानज्योती महीला मंडळाच्या महिला फुगड्या आणि धालो सादर करणार आहेत.

'नाचुया कुपासार' या सिनेमामुळे सगळीकडे नाव झालेले सिने निर्माते आणि दिग्दर्शक बाडरॉय बार्रेटो यांच्या या सिनेमाचे या महोत्सवात स्क्रीनिंग होणार असून त्यांचे यावेळी व्याख्यानही होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com