Konkan Railway : कोकण रेल्वेचे वेळापत्रक कोलमडणार; माजोर्डा उड्डाण पुलाच्या कामामुळे परिणाम

Konkan Railway : केंद्र सरकारच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाकडून हे काम केले जाणार आहे. पश्चिम बगल मार्गासाठी तुळया उभारण्यात येणार असल्याने कोकण रेल्वेवर जवळजवळ संपूर्ण मे महिना हा ब्लॉक सुरू राहणार आहे.
Konkan Railway
Konkan Railway Dainik Gomantak

Konkan Railway :

पणजी, कोकण रेल्वेवरील माजोर्डा ते मडगाव विभागात उड्डाणपुलाचे (आरओबी) बांधकाम करण्यात येणार आहे. त्यामुळे महिनाभर रेल्वेच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे. सध्या कोकण रेल्वेने केवळ नेत्रावती एक्सप्रेसच्या वेळापत्रकावर प्रभाव जाणवेल असे स्पष्ट केले आहे.

केंद्र सरकारच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाकडून हे काम केले जाणार आहे. पश्चिम बगल मार्गासाठी तुळया उभारण्यात येणार असल्याने कोकण रेल्वेवर जवळजवळ संपूर्ण मे महिना हा ब्लॉक सुरू राहणार आहे. परिणामी कोकण रेल्वेवरील नेत्रावती एक्सप्रेस रेल्वेगाड्यांसह बहुसंख्य रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक कोलमडण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

उन्हाळ्याच्या सुट्टीनिमित्त मूळगावी जाणाऱ्यांची संख्या अधिक आहे. यासह गोव्यात तिसऱ्या टप्प्यातील निवडणूक ७ मे रोजी पार पडणार असल्याने कोकणासह गोव्यात येणाऱ्या मतदारांची गाड्यांना गर्दी आहे. मात्र, कोकण रेल्वेने गोव्यातील माजोर्डा आणि मडगाव या विभागादरम्यान २ मे ते २९ मे पर्यंत ब्लॉक घेतला आहे.

Konkan Railway
Goa Today's Top News : राणेंचा गौप्यस्फोट, लोकसभा, राजकारण, अपघात; राज्यातील ठळक बातम्या एका क्लिकवर

ब्लॉकच्या या कालावधीत गाडी क्रमांक १६३४५ लोकमान्य टिळक टर्मिनस ते तिरुवनंतपुरम सेंट्रल नेत्रावती एक्स्प्रेस करमळी ते रत्नागिरी दरम्यान सुमारे ७० मिनिटे उशिराने धावेल. त्यामुळे प्रवाशांच्या प्रवासाचा खोळंबा होईल.

या रेल्वेगाडीचा एकूण १,८०४ किमीचा प्रवास सुमारे ३० तास १० मिनिटांचा असतो. परंतु ब्लॉकमुळे यात ७० मिनिटे अधिक वाढल्याने प्रवाशांना अधिकचा एक तास वाढेल.

Konkan Railway
Goa Today's Top News : राणेंचा गौप्यस्फोट, लोकसभा, राजकारण, अपघात; राज्यातील ठळक बातम्या एका क्लिकवर

विलंबाने धावणार गाड्या

गाडी क्रमांक १७३१० वास्को द गामा – यशवंतपूर एक्स्प्रेसचा प्रवास वास्को द गामावरून रात्री १०.५५ वाजता निघण्याऐवजी रात्री ११.३५ वाजता निघेल. त्यामुळे ही रेल्वेगाडी ४० मिनिटे उशिराने सुटल्याने, पुढील स्थानकात विलंबाने पोहचेल. यासह इतर रेल्वेगाड्यांवर परिणाम होईल असे सध्या दिसते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com