Konkan Railway Timetable : पावसाळी हंगामासाठी रेल्वेचे खास वेळापत्रक : आजपासून अंमलबजावणी

Konkan Railway Timetable : प्रशासनाकडून जाहीर ः मुंबईकरीता अधिक गाड्या सोडणार
Konkan Railway
Konkan Railway Dainik Gomantak

Konkan Railway Timetable :

सासष्टी, पावसाळ्यासाठी कोकण रेल्वेने रेल्वे गाड्यांसाठी खास वेळापत्रक तयार केले असून त्याची अंमलबजावणी उद्यापासून (ता.१०) केली जाणार असल्याचे कोकण रेल्वे प्रशासनातर्फे जाहीर करण्यात आले आहे.

हे वेळापत्रक ३१ ऑक्टोबर २०२४ पर्यंत लागू राहील. रेल्वेचे वेळापत्रक असे : १) २२११९ मुंबई-मडगाव (तेजस एक्सप्रेस) आठवड्यातून तीन दिवस (मंगळवार, गुरुवार व शनिवार) ११ जून ते २९ ऑक्टोबर (३१ ऑक्टोबर २०१४ रोजी सेवा नाही), २) २२१२० मडगाव-मुंबई (तेजस एक्सप्रेस) आठवड्यातून तीन दिवस (बुधवार, शुक्रवार व रविवार) १२ जून ते ३० ऑक्टोबर.३) २२२२९ मुंबई ते मडगाव (वंदे भारत एक्सप्रेस) सोमवार,

Konkan Railway
Goa Crime News: पर्वरीत क्रिकेटवर ऑनलाईन सट्टा; गुजरातच्या तिघांना अटक, 10 लाखांचे साहित्य जप्त

बुधवार, शुक्रवार (१० जून ते ३० ऑक्टोबर), ४) २२२३० मडगाव ते मुंबई (वंदे भारत एक्सप्रेस) मंगळवार, गुरुवार, शनिवार (११ जून ते ३१ ऑक्टोबर), ५) ११०९९ (लोकमान्य टिळक ते मडगाव) शुक्रवार व रविवार (१४ जून ते २७ ऑक्टोबर २०२४), ६) १११०० (मडगाव ते लोकमान्य टिळक) शनिवार ते सोमवार (१५ जून ते २८ ऑक्टोबर २०२४).

बिगर मान्सून वेळापत्रक १ नोव्हेंबरपासून : १) ११०९९ लोकमान्य टिळक ते मडगाव - मंगळवार, शुक्रवार, शनिवार, रविवार. २) १११०० मडगाव ते लोकमान्य टिळक - मंगळवार, शुक्रवार, शनिवार, रविवार. ३) २२११९ मुंबई ते मडगाव (तेजस एक्सप्रेस) सोमवार व गुरुवार वगळून. ४) २२१२० मडगाव ते मुंबई (तेजस एक्सप्रेस) सोमवार व गुरुवार वगळून. ५) २२२२९ मुंबई ते मडगाव (वंदे भारत) शुक्रवार वगळून. ६) २२२३० मडगाव ते मुंबई (वंदे भारत) शुक्रवार वगळून.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com