Gold Robbery: 1 कोटीचे सोने चोरणाऱ्या टोळीला अटक; कोकण रेल्वे पोलिसांची मोठी कारवाई

पोलिसांनी सोनसाखळी चोरीच्या घटनांमध्ये सहभागी असलेल्यांना ताब्यात घेतले आहे.
Konkan railway police arrested 4 accused in connection with gold robbery
Konkan railway police arrested 4 accused in connection with gold robberyDainik Gomantak

Gold Robbery Accused Arrested: मागील काही महिन्यात राज्यभरात सोनसाखळी चोरीच्या घटनांमध्ये कमालीची वाढ झाली आहे. यामध्ये अनेकजण गजाआड झाले असून काही चोरांना शोधण्यासाठी पोलीस सापळे रचत प्रयत्न करतच आहेत. दरम्यान, कोकण रेल्वे पोलिसांनी सोनसाखळी चोरीच्या घटनांमध्ये सहभागी असलेल्यांना ताब्यात घेतले आहे.

Konkan railway police arrested 4 accused in connection with gold robbery
सीआरझेड उल्लंघन प्रकरणी GCZMA कडून 104 जणांना दंड वसुलीच्या नोटीसा

1 मे 2023 रोजी दाखल झालेल्या सोन्याच्या चोरीच्या गुन्ह्यातील 4 आरोपींना कोकण रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. कोकण रेल्वे पोलिसांनी या चोरट्यांकडून तब्बल1 कोटी रुपयांचे सोने आणि 50000 हजारांची रोकडही जप्त केली आहे.

माहितीनुसार, या चोरट्यांचा इतरही चोरीच्या घटनांमध्ये सहभाग होता.

दरम्यान, सोनसाखळी चोरीच्या घटनांकडे पोलीस विशेष लक्ष देऊन आहेत. काही दिवसांपूर्वी चिंचिणीत अज्ञात स्कूटरचालकाने आपल्या गळ्यातील सोनसाखळी पळवल्याची तक्रार एका महिलेने कुंकळ्ळी पोलिस स्थानकात दाखल केली. त्यानंतर पोलिसांना आरोपीला पकडण्यात यश आले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com