नारळ काढणं जीवावर बेतलं; गोव्यात माडावरून कोसळून कोल्हापूरच्या व्यक्तीचा मृत्यू

Calangute Goa: झाडावरुन कोसळून जखमी झालेल्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.
नारळ काढणं जीवावर बेतलं; गोव्यात माडावरून कोसळून कोल्हापूरच्या व्यक्तीचा मृत्यू
Calangute Goa
Published on
Updated on

Calangute Goa

कळंगुट: माडाच्या झाडावरुन नारळ काढणं कोल्हापूरच्या व्यक्तीच्या जीवावर बेतलं आहे. बागा, कळंगुट येथे आज (३१ ऑगस्ट) दुपारी ही घटना घडली.

बाळु धोंडीबा कुंभार ( रा. बागा, कळंगुट, मूळ- कोल्हापूर) असे मृत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बाळु कुंभार नारळ काढण्यासाठी माडाच्या झाडावर गेले असता त्यांचा तोल जाऊन ते खाली कोसळले. जखमी अवस्थेत बाळु यांना म्हापसा येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केले. पण, पोलिसांनी त्यांना मृत घोषित केले. साळगाव पोलिसांनी याप्रकरणी अनैसर्गिक मृत्यूची नोंद केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com