Kolem News :कुळे, बेळगावहून येणाऱ्या चालत्या ट्रकला आग, ३२ लाखांचे नुकसान

Kolem News : ट्रक मोले आउटपोस्ट जवळ येईपर्यंत ट्रकमधील अर्धे अधिक साहित्य जाळून खाक झाले होते. प्रसंगावधान राखत ट्रक चालकाने ट्रक थांबवला मात्र तोपर्यंत सुमारे ३२ लाखांचे साहित्य जळून खाक झाले.
Kolem
KolemDainik Gomantak
Published on
Updated on

Kolem News :

कुळे, बेळगावहून कुंडईला येणाऱ्या ट्रकला बुधवारी रात्री साडेदहाच्या सुमारास अचानक आग लागून ३२ लाखांचे नुकसान झाले.

कुळे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी रात्री अनमोड घाट उतरताना ट्रकला आग लागली होती. मागाहून येणाऱ्या काही वाहन चालकांनी ट्रक चालकाला सावध करण्याचा प्रयत्न केला, परंतु चालकाने त्याकडे दुर्लक्ष केले.

ट्रक मोले आउटपोस्ट जवळ येईपर्यंत ट्रकमधील अर्धे अधिक साहित्य जाळून खाक झाले होते. प्रसंगावधान राखत ट्रक चालकाने ट्रक थांबवला मात्र तोपर्यंत सुमारे ३२ लाखांचे साहित्य जळून खाक झाले. फोंडा अग्निशामक दलाच्या जवान, कुळे पोलिस व मोले वन खात्याच्या कर्मचाऱ्यांनी आग विझविली.

Kolem
Workers March Goa: पोटावर लाथ मारणारे सरकार हवे कशाला? फार्मा कंपन्यांवरील एस्मा मागे घ्या; पणजीत कामगारांचा एल्गार

कुळे पोलिस स्थानकाचे निरीक्षक सगुण सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सदानंद देसाई पुढील तपास करत आहेत.

कुळे पोलिस हद्दीत येणारा भाग मोठा असून यात अनमोड घाटही येतो. या घाटात अनेक अपघात होतात. तसेच आग लागण्याच्याही अनेक घटना घडलेल्या आहेत.

आग लागल्यास ३० की.मी अंतरावर असलेल्या फोंडा किंवा कुडचडे येथील अग्निशामक दलाला पाचारण करावे लागते. वेळीच ही मदत पोहचत नसल्याने मोठे नुकसान होते. त्यासाठी मोले येथे अग्निशामक दल तैनात असावे, अशी मागणी होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com