Bicholim News : यंदा आमसुले होणार महाग; बाजारात तुटवडा

Bicholim News :अवकाळी पावसाचा फटका आधीच प्रतिकूल हवामानामुळे यंदा कोकम पिकावर परिणाम झाला आहे. त्यातच अवकाळी पावसाचा तडाखा, यामुळे आमसुले करण्यात अडचण निर्माण झाली आहे. त्‍
Bicholim
BicholimDainik Gomantak

Bicholim News :

डिचोली, दैनंदिन जीवनातील एक घटक असलेली आणि ‘हुमणा’ची लज्जत वाढवणारी कोकमची आमसुले (सोले) यंदा महाग होण्याची शक्यता आहे.

आधीच प्रतिकूल हवामानामुळे यंदा कोकम पिकावर परिणाम झाला आहे. त्यातच अवकाळी पावसाचा तडाखा, यामुळे आमसुले करण्यात अडचण निर्माण झाली आहे. त्‍यामुळे यंदा बाजारात आमसुलांचा तुटवडा जाणवत आहे. परिणामी ती ‘आंबट’ होण्याची शक्यता आहे. तसे संकेतही विक्रेत्यांकडून मिळाले आहेत.

गेल्या काही वर्षांच्या तुलनेत यंदा डिचोलीत कोकमच्या सोलांचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. डिचोलीच्या आठवडी बाजारातही या आमसुलांचे प्रमाण कमी दिसून येत असून, यंदा ही आमसुले महाग झाली आहेत.

Bicholim
Kokum Benefits: उन्हाळ्याच्या महिन्यांत का वापरले जाते कोकम

डिचोली तालुक्यातील कुडचिरे, म्हावळिंगे, कारापूर, मये, धुमासे, साळ आदी बहुतांश भागात कोकमची झाडे आहेत. या भागात कोकमच्या फळांपासून (भिंडा) आमसुले तयार करतात. यंदा आधीच कोकमच्या झाडांच्या बहरावर परिणाम झाला आहे. त्यातच अवकाळी पावसाचा तडाखा, त्यामुळे कोकमची फळे झाडांवरच खराब होत आहेत.

काही भागातील बागायतदारांनी हाती लागलेल्या कोकमपासून आमसुले केलीत आहेत. पण पावसामुळे ती व्यवस्थित वाळवायला मिळाली नाहीत. त्यामुळेच आमसुलांच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. परिणामी यंदा आमसुलांचे प्रमाण जवळपास ५० टक्क्यांनी घटल्याचा अंदाज आहे.

यंदा कोकमच्या आमसुलांचा तुटवडा निर्माण झाल्याने ती महाग झाली आहेत. सध्या १५० रुपये पड तर ५०० रुपये पायली असे आमसुलांचे दर आहेत. गेल्या वर्षी हेच दर १०० रुपये पड तर ४०० रुपये पायली असे होते. महाग असली, तरी आहारातील घटक असल्याने आमसुलांना मागणी आहे. पावसाचे दिवस असल्याने आता शेवटच्या टप्प्यात आमसुले करणे अशक्य आहे.

त्यामुळे पुढील काही दिवसात आमसुलांचे दर वाढण्याची शक्यता आहे. असे संकेत विक्रेत्यांकडून मिळाले आहेत. पावसावरच आमसुलांच्या दराचा चढउतार ठरणार आहे, असे एक विक्रेता संदेश गावस यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com