गोव्यात 95 हेक्टर क्षेत्रफळात कोकमची लागवड; 824 टन उत्पादन; सर्वाधिक लागवड सांगे परिसरात

Kokum Farming Financial Year: ज्यात यंदाच्या आर्थिक वर्षात ९५ हेक्टर क्षेत्रफळात कोकमची लागवड करण्यात आली आहे. तर, एकूण ८२४ टन उत्पादन घेण्यात आले असल्याचे कृषी संचालनालयाच्या अहवालात म्हटले आहे.
kokam goa
Kokam FarmingDainik Gomantak
Published on
Updated on

Kokum agricultural statistics for Goa

पणजी: राज्यात यंदाच्या आर्थिक वर्षात ९५ हेक्टर क्षेत्रफळात कोकमची लागवड करण्यात आली आहे. तर, एकूण ८२४ टन उत्पादन घेण्यात आले असल्याचे कृषी संचालनालयाच्या अहवालात म्हटले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कोकम लागवड ४ हेक्टरने वाढली आहे.

कोकम हे गोवा आणि कोकणातील अन्नसंस्कृतीचा महत्त्वाचा घटक आहे. गोमंतकीय जेवणात त्याचा वापर केला जातो. शरीराला थंडावा मिळावा यासाठी कोकम सरबत आदी विविधांगी शीतपेये बनवून त्याचे सेवन केले जाते. जेवणानंतर जोपर्यंत आपण सोलकढी पीत नाही तोपर्यंत गोमंतकीयांचे जेवण पूर्ण होत नाही. त्यामुळे कोकम आणि गोमंतकीय खाद्यसंस्कृतीचे अतुट नाते आहे.

kokam goa
Goa Farming: गोव्याच्या कृषी अर्थव्यवस्थेत महत्वाचे योगदान ठरणारी 'सुपारीची शेती'

राज्यात यंदा ४ हेक्टरने कोकम लागवड क्षेत्रफळात वाढ झाली आहे. परंतु ही वाढ केवळ दक्षिण गोव्यात झाली आहे. उत्तर गोव्यात गतसाली इतकीच म्हणजे ३७ हेक्टरच लागवड आहे. गतसाली दक्षिण गोव्यात ५४ हेक्टरमध्‍ये कोकम लागवड होती.

kokam goa
Goa Drug Case: सनबर्न, थर्टी फर्स्टपूर्वी गोवा पोलिसांची मोठी कारवाई; तब्बल 10 लाखांचा गांजा जप्त

सर्वाधिक लागवड

राज्यातील प्रत्येकाला जरी कोकम हवे असले तरी तिसवाडी, डिचोली आणि बार्देश तालुक्यात कोकम लागवडीची नोंद करण्यात आलेली नाही. परंतु राज्यात सर्वाधिक लागवडीखालील असलेले क्षेत्रफळ सांगे आहे. तेथे सर्वाधिक २० हेक्टर क्षेत्रफळात लागवड करण्यात येते. तर, सर्वात कमी प्रत्येकी १ हेक्टर लागवड मुरगाव आणि धारबांदोडा तालुक्यात होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com