Kokan Railway: कोकण रेल्‍वेचे वेळापत्रक अजूनही विस्‍कटलेलेच; आतापर्यंत १४ गाड्या रद्द

Kokan Railway Timetable: ७ गाड्या दुसऱ्या मार्गाने वळवण्यात आल्या तर ४ गाड्या अंशतः रद्द केलेल्या आहेत
Kokan Railway Timetable: ७ गाड्या दुसऱ्या मार्गाने वळवण्यात आल्या तर ४ गाड्या अंशतः रद्द केलेल्या आहेत
Railway Track Canva
Published on
Updated on

कोकण रेल्वे मार्गावर दरड कोसळल्यामुळे ‍आतापर्यंत १४ गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. ७ गाड्या दुसऱ्या मार्गाने वळवण्यात आल्या तर ४ गाड्या अंशतः रद्द केलेल्या आहेत.

गाडी क्रमांक १०१०३ मुंबई सीएसएमटी मडगाव जं. १५ रोजी सुरू होणारी मांडवी एक्प्रेसचा प्रवास पूर्णपणे रद्द करण्यात आला आहे. तर गाडी क्र. ५०१०८ मडगाव जं. सावंतवाडी रोड १५ रोजीची प्रवासी गाडी रद्द केली. रेल्वे क्रमांक १०१०६ सावंतवाडी रोड-दिवा एक्स्प्रेसचा प्रवास १५ रोजीचा रद्द करण्यात आला आहे. गाडी क्रमांक २२२२९ मुंबई सीएसएमटी मडगाव जं. वंदे भारत एक्सप्रेसचा १५ रोजीचा प्रवास रद्द करण्यात आला आहे.

गाडी क्रमांक १०१०४ मडगाव जं. मुंबई मांडवी एक्स्प्रेसचा १५ रोजीचा प्रवास रद्द करण्यात आला. गाडी क्र. ११००४ सावंतवाडी रोड दादर तुतारी एक्सप्रेसचा १५ रोजीचा प्रवास रद्द करण्यात आला. रेल्वे क्रमांक १२१३४ मंगळुरु जं.- मुंबई एक्सप्रेसचा १५ रोजीचा प्रवास रद्द करण्यात आला आहे.

गाडी क्रमांक १२१३३ मुंबई सीएसएमटी - मंगळुरू जं. १४ रोजी सुरू होणारा प्रवास रद्द करण्यात आला आहे. गाडी क्रमांक २०१११ मुंबई सीएसएमटी - मडगाव जं. कोकण कन्या एक्सप्रेसचा १४ रोजीचा प्रवास रद्द केला.

गाडी क्रमांक ११००३ मुंबई सीएसएमटी मडगाव जं. तुतारी एक्सप्रेसचा १५ रोजीचा प्रवास रद्द केला. गाडी क्रमांक ५०१०४ रत्नागिरी दिवा पॅसेंजर गाडी रद्द करण्यात आली. गाडी क्रमांक १२०५१ मुंबई सीएसएमटी - मडगाव जं. जनशताब्दी एक्सप्रेसचा १५ रोजीचा प्रवास रद्द करण्यात आला आहे. गाडी क्रमांक १०१०५ दिवा-सावंतवाडी रोड एक्स्प्रेसचा १५ रोजीचा प्रवास रद्द करण्यात आला आहे. गाडी क्रमांक ५०१०७ सावंतवाडी रोड मडगाव जं. रद्द करण्यात आली.

Kokan Railway Timetable: ७ गाड्या दुसऱ्या मार्गाने वळवण्यात आल्या तर ४ गाड्या अंशतः रद्द केलेल्या आहेत
Kokan Railway: कोकण रेल्‍वे मार्गावर अजूनही दोन गाड्या रद्द

वळवण्यात आलेल्या गाड्या

गाडी क्र. २२१५० पुणे जं. एर्नाकुलम जं. एक्सप्रेस १४ रोजीचा प्रवास कल्याण - लोणावळा - दौंड मार्गे वळवले. वाडी - गुंटकल - धर्मावरम जं. - जोलारपेट्टाई - पलक्कड - शोरनूर मार्गे वळवला. गाडी क्र. १६३४५ लोकमान्य टिळक (टी) - तिरुवनंतपुरम सेंट्रल नेत्रावती एक्स्प्रेसचा १४ रोजीचा प्रवास दुसर्‍या मार्गाने वळवला. गाडी क्र. ०९०५७ उधना मंगळुरु जंक्शन गाडी कल्याण लोणावळा दौंड जंक्शन मार्गे वळवण्यात आली आहे. गाडी क्र. १२४३२ ह निजामुद्दीन तिरुवनंतपुरम मध्य राजधानी एक्सप्रेसचा प्रवास पनवेल - लोणावळा - दौंड जंक्शन मार्गे वळवली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com