Konkan Railway Fine Collection: फुकट्यांना कोकण रेल्वेचा दणका, एप्रिलमध्ये 2.70 कोटी दंड वसूल

Konkan Railway Fine Collection: उन्हाळी सुट्टी आणि पर्यटन हंगाम यामुळे गोव्यासह कोकणात प्रवास करणाऱ्याचे प्रमाण अधिक असते.
Konkan Railway Fine Collection
Konkan Railway Fine CollectionDainik Gomantak

Konkan Railway Fine Collection

रेल्वेतून अनेकजण विनातिकीट प्रवास करताना पकडले जातात. कोकण रेल्वेने अशा फुकट्यांना चांगलाच धडा शिकवत एप्रिल महिन्यात तब्बल 2.70 कोटी रुपयांचा दंड वसूल केला आहे. विशेष म्हणजेच ही वसुली आजवरची सर्वात मोठी असल्याचे माहिती विभागाने दिलीय.

उन्हाळी सुट्टी आणि पर्यटन हंगाम यामुळे गोव्यासह कोकणात प्रवास करणाऱ्याचे प्रमाण अधिक असते. अशात बऱ्याचवेळा तिकीट मिळत नाही, त्यामुळे विनातिकीट प्रवास करण्याचे प्रकार घडतात. तर, अनेकवेळा मुद्दाम तिकीट न काढता प्रवासी रेल्वतून प्रवास करण्याचा धोका पत्कारतात.

दरम्यान, तिकीट तपासणी अधिकारी प्रवासादरम्यान अथवा स्थानकावर उतरल्यानंतर प्रवाशांचे तिकीट तपासात अशावेळी तिकीट नसणाऱ्यांची तारांबळ उडते. कोकण रेल्वेने अशा फुकट्यांकडून दंड वसुली केली आहे.

Konkan Railway Fine Collection
Goa Crime: रस्ता अडविणे, दंगल माजविणे याप्रकरणी कुंकळ्ळीत 400 भाविकांविरोधात गुन्हा

मांडवी एक्सप्रेस 12 दिवस दीड तास उशीराने धावणार

गोव्यातून मडगाव स्थानकावरून मुंबईसाठी सुटणारी मांडवी एक्सप्रेस बुधवारपासून (दि.22 मे) 12 दिवस दीड तास उशीराने धावेल. 22 मे ते 02 जून या काळात रात्री 9:15 वाजता सुटणारी गाडी रात्री 10:30 वाजता मडगाव स्थानकावरुन सुटेल.

मुंबईत ईलेक्ट्रिक इंटरलॉकिंगचे काम सुरु असल्याने हा बदल करण्यात आला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com