फोंडा: राज्यातील वाढती गुन्हेगारी व ड्रग्सविक्रीचा सुळसुळाट, यामुळे गोव्याचे नाव बदनाम होऊ लागले आहे. शेख मैनुद्दीन तंदूर यांच्यावर चाकूने वार करून गंभीर जखमी केल्याप्रकरणी फोंडा पोलिसांनी नाझरुद्दीन तंदूर आणि अब्दुल जमीर तंदूर यांना अटक केली आहे. मालमत्तेच्या वादातून आरोपींनी फिर्यादीला मारहाण केली असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
(Knife attack in ponda over property dispute)
राज्यातील वाढती गुन्हेगारी व ड्रग्सविक्रीचा सुळसुळाट, यामुळे गोव्याचे नाव बदनाम होऊ लागल्याने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी त्याची गंभीर दखल घेत पोलिस मुख्यालयात पोलिस उपअधीक्षक पदावरील अधिकाऱ्यांची बैठक घेऊन ड्रग्स व्यवसायाचा नायनाट करण्याच्या सूचना केल्या आहेत. पर्यटनस्थळाबरोबरच गोवा हे ड्रग्सविक्री केंद्र म्हणून नावारुपास आल्याने सरकारने ड्रग्सचा व्यवसायच मोडून काढण्यास ठोस पावले उचलली आहेत.
गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी सरकारने केली मोठी घोषणा
गोवा सरकारने राज्यातील गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी कंबर कसली असून, गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी गोमंतकीयांना आता घरबसल्या तक्रार दाखल करता येणार आहे. अशी माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली आहे.
राज्यातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी गोवा सरकार पोलीस समर्पित एक मोबाइल अॅप्लिकेशन लॉन्च करणार आहे. त्याच्यावरुन घरबसल्या तक्रार दाखल करता येणार आहे. आमदार केदार नाईक आणि पोलीस महासंचालक जसपाल सिंग यांच्या उपस्थितीत आज पणजी येथील पोलीस चौकीच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी त्यांनी ही माहिती दिली.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.