Khasdar Chashak 2023: ...आणि श्रीपाद नाईक यांनी हाती घेतली बॅट, बेती येथे खासदार चषकाचे उद्घाटन

खासदार चषक विजेत्या संघाला दोन लाख रुपयांचे आणि उपविजेत्याला एक लाख रुपयांचे पारितोषक देण्यात येणार आहे.
Khasdar Chashak 2023:
Khasdar Chashak 2023:Shripad Naik Twitter Handle

Khasdar Chashak 2023: केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग तसेच पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते आज खासदार चषकाचे उद्घाटन करण्यात आले. रामनगर, बेती मैदान येथे खासदार चषक आयोजित करण्यात आलाय. यावेळी नाईक यांनी बॅट हातात घेऊन त्यांचे क्रिकेट कसब दाखवले.

यावेळी राज्याचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत आणि भाजप गोवा प्रदेशाध्यक्ष सदानंद शेठ तानावडे उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून खासदार चषकाचे आयोजन करण्यात येत असल्याचे श्रीपाद नाईक यावेळी म्हणाले. देशातील युवकांना विविध क्रीडा स्पर्धांच्या माध्यमातून तंदुरुस्त ठेवणे आवश्यक आहे, त्यामुळे देशभर अशाप्रकारच्या विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येत असल्याचे नाईक यांनी सांगितले.

Khasdar Chashak 2023:
Russian drowns at Keri beach: रशियन नागरिकाचा केरी बीच येथे बुडून मृत्यू, मायदेशी परतण्यापूर्वी काळाचा घाला

राज्यातील युवकांना ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांच्या रुपाने मोठी संधी मिळाली आहे. युवकांनी विविध स्पर्धांमध्ये सहभाग घेण्यासाठी प्रयत्न करावे तसेच स्पर्धा पाहण्यासाठी उपस्थित राहावे, असे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत याप्रसंगी म्हणाले.

Khasdar Chashak 2023:
SC Hearing On Maharashtra Political Crisis: शिंदे-ठाकरे, राज्यपाल, नबाम रेबिया; न्यायालयात काय झालं? पाच मुद्दे

अधिक युवा लोक असलेला आपला देश प्रतिभासंपन्न आहे. कौशल्याला विविध व्यासपीठांच्या माध्यमातून संधी देणे आवश्यक आहे. सरकार आर्थिक सहाय्यासह विविध योजनांच्या माध्यमातून क्रीडा प्रतिभेला वाव देण्याचे काम करत आहे. गोव्यातूनही देशपातळीवर विविध स्पर्धांमध्ये क्रीडापटू समोर येण्यासाठी अशाप्रकारच्या संधी मिळण्यासाठी खासदार चषक यासारख्या स्पर्धांच्या आयोजन करण्यात येत असल्याचे श्रीपाद नाईक म्हणाले.

खासदार चषक विजेत्या संघाला दोन लाख रुपयांचे आणि उपविजेत्याला एक लाख रुपयांचे पारितोषक देण्यात येणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com