खरी कुजबुज: मुद्देसूद बोलणारे आमदार फेरेरा

Khari Kujbuj Political Satire: कायद्याने बंदी असतानाही ‘सिंगल यूज प्लास्टिक’चा वापर काही कमी होत नाही
Khari Kujbuj Political Satire: कायद्याने बंदी असतानाही ‘सिंगल यूज प्लास्टिक’चा वापर काही कमी होत नाही
Khari Kujbuj Political SatireDainik Gomantak
Published on
Updated on

मुद्देसूद बोलणारे आमदार फेरेरा

सध्या विधानसभेचे कामकाज सुरू आहे व खात्याच्या मागण्यांवरील चर्चाही दुपारच्या सत्रात सुरू होते. या मागण्या सादर केल्यानंतर त्यावर बोलण्यासाठी कोणी सुरुवात करत नाही. विरोधकांतील काँग्रेसचे आमदार कार्लोस फेरेरा हे सुरुवात करतात. ते व्यवसायाने वकील असल्याने ते खात्यावरील मागण्यांवेळी मुद्दे अगोदरच तयार करून आणतात. त्यांचे हे मुद्दे राज्याच्या तसेच त्यांच्या मतदारसंघातील समस्यांसंदर्भात असतात. कमीत कमी ते साधारण अर्धा तास तरी या मागण्यांवर बोलतात. काँग्रेसतर्फे ते व विरोधी पक्षनेते हे सत्ताधारी मंत्र्यांना चांगलेच धारेवर धरतात. ते पहिल्यांदाच आमदार झाले आहेत व त्यांना कायद्याचेही चांगले ज्ञान आहे. त्यामुळे विधानसभेत प्रश्‍न मांडताना किंवा मागण्यांवरील चर्चेवेळी त्यांनी मांडलेले मुद्दे माहितीच्या आधारावर असतात. चर्चेची सुरुवात त्यांना करण्यास मिळत असल्याने ते त्याचा पुरेपूर लाभ उठवत अधिकाधिक वेळ घेतात. सभापती वेळ संपल्याची बेल मारत असतात, मात्र एकच मुद्दा असे म्हणत ते आपले म्हणणे संपल्याशिवाय जागेवर बसत नाहीत.

ताळगावच्या समस्‍या कागदावरच!

ताळगाव येथील फुटबॉल मैदानाचा दर्जा वाढवण्यासाठी यापूर्वी कधीच प्रयत्न स्थानिक आमदारांकडून झाले नाहीत. या मैदानावर अनेक खेळाडू सरावासाठी येतात. ताळगावातील हे एकमेव मैदान आहे, जे उरले आहे. या मतदारसंघात मैदानासाठी जागाच उरलेली नाही. जिकडे तिकडे टोलेजंग इमारती उभ्या राहत आहेत. विधानसभा कामकाजावेळी ताळगावातील अनेक विषय मांडले जातात. मात्र त्यानंतर स्थानिक आमदारांकडून त्याचा पाठपुरावाच होत नाही. या मतदारसंघात पाण्याची मोठी समस्या आहे. मात्र त्यासाठी सरकारी पातळीवर स्थानिक आमदारांनी यापूर्वी विधानसभेत प्रश्‍न मांडला. सरकारनेही तेथे नव्याने पाण्याची टाकी उभारली जाईल, असे आश्‍वासनही दिले होते. मात्र ते पूर्ण झालेले नाहीत. विधानसभेत विषय मांडायचे मात्र, ते मार्गीच लागत नाहीत. परिणामी समस्या कागदावरच राहतात.

बाप तो थाही, बेटी भी सवाई!

ज्येष्ठ व आधुनिक विचारांचे पत्रकार, साहित्‍यिक अनंत साळकर यांचे देहावसान होऊन आता दोन वर्षे होत आली. वृत्तपत्रसृष्‍टी, साहित्‍य विश्‍‍वात त्‍यांचे कार्य चिरंजीवी आहे. त्‍यांची आठवण ठायीठायी साऱ्यांच्‍या सोबत आहे. कालच गोवा विद्यापीठाचा दीक्षांत सोहळा झाला, तेव्‍हा साळकर यांची कन्‍या मेखला हिने ‘एमए’ इंग्रजीत ‘अव्‍वल’ प्राविण्‍य मिळवल्‍याने फ्रान्‍सिस्‍को कोरिया अफोन्‍सो स्‍मृती पुरस्‍काराने तिला गौरविण्‍यात आले. योगायोग पाहा! १९८५ साली अनंत साळकर ‘एमए’मध्‍ये विद्यापीठात पहिले आले होते. म्‍हणतात ना, वारसा जपण्यासाठी असतो. असलेल्यांच्या रूपात गेलेल्यांचा आरसा असतो! तेच खरे.∙∙∙

कारवाईचा केवळ देखावा नको!

कायद्याने बंदी असतानाही ‘सिंगल यूज प्लास्टिक’चा वापर काही कमी होत नाही. कारवाई केली, की काही दिवसांसाठी हे प्लास्टिक बाजारातून गायब होते. एकदा का मोहीम थंडावली की, पुन्हा सर्रास ‘सिंगल यूज प्लास्टिक’चा वापर पूर्ववत सुरू होतो. सोमवारी डिचोली मामलेदार आणि पालिकेच्या संयुक्त कारवाईवेळी डिचोली बाजारातून काही दुकानांमधून ‘सिंगल यूज प्लास्टिक’च्या वस्तू जप्त करण्यात आल्या. चिंतेची बाब म्हणजे काही दुकानांमधून तंबाखूजन्य पदार्थही जप्त करून दुकानदारांना दंड ठोठावण्यात आला. आता काही दिवस दुकानदार ‘सिंगल यूज प्लास्टिक’ आणि तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करण्याचा धोका पत्करणार नाही. बाजारातून ‘सिंगल यूज प्लास्टिक’सह तंबाखूजन्य पदार्थ कायमचे बंद करावयाचे असल्यास धडक कारवाईची मोहीम सुरू ठेवायला हवी आहे. केवळ देखावा नको!

मुहूर्तालाच कुजका नारळ?

योजना कितीही चांगली व भव्य-दिव्य असली तरी जर का मुहूर्तालाच कुजका नारळ निघाला तर ती वाया जाते,असे जाणकार सांगतात. २०११-१२ दरम्यान, दिगंबर कामत यांच्या नेतृत्वाखालील कॉंग्रेस सरकारने गोवा मुक्तीच्या सुवर्णमहोत्सवानिमित्ताने नगरपालिका व ग्रामपंचायतींसाठी भरीव आर्थिक मदत करणारी ‘सिग्नेचर प्रोजेक्ट’ नामक योजना आखली होती. पालिका व पंचायतींच्या वर्गाप्रमाणे ही आर्थिक मदत ‘सिग्नेचर प्रकल्प’ उभारण्यासाठी होती. सदर प्रकल्पातून संबंधित संस्थांना कायमस्वरुपी महसूल मिळावा हा हेतू होता. पण मुद्द्याची बाब म्हणजे बहूतेक पंचायती वा पालिका,असा प्रकल्प उभारण्याऐवजी कोट्यवधींचा तो निधी बॅंकेत ठेवून त्याचे व्याज मिळवत आहेत. दुसरी बाब म्हणजे कोणालाच त्याचे काही पडलेले नाही.एखादा जरी प्रकल्प उभा झाला असता तर त्याचे परीक्षण तरी करता आले असते, असे जाणकार सांगतात. मडगाव पालिकेने आखलेला बहुमजली पार्किंग प्रकल्प हा याच योजनेतील होता. पण त्याचा २०१५ मध्ये पायाभरणी तेवढी केली गेली. घोडे तेवढ्यावर खोळंबून आहे.

तुम हमे खून दो, हम तुम्हे लॉटरी देंगे!

मनात इच्छा असेल, तर मोठे दिव्य साकार करू शकता, हे केपे गणेशोत्सव मंडळाचे माजी अध्यक्ष इच्छित फळदेसाई या युवकाने आपल्या कर्तृत्वाने सिद्ध करून दाखविले आहे. केपे गणेशोत्सव मंडळ मोठ्या बक्षिसांच्या लॉटरीसाठी प्रसिद्ध आहे.धार्मिक व सांस्कृतिक कार्याबरोबरच सामाजिक कर्तव्यही मंडळाचे सदस्य पाळतात. लॉटरीच्या प्रसिद्धीचा फायदा घेऊन इच्छित फळदेसाई यांनी गेल्या वर्षी ‘तुम हमे खून दो, हम तुम्हे लॉटरी देंगे’ या घोषवाक्यावर रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. गेल्या वर्षी या संकल्पनेला चांगला प्रतिसाद लाभला व शंभरावर लोकांनी गेल्या वर्षी रक्तदान केले, त्यांना रांगेत न राहता लॉटरी तिकीट मिळाले. महत्वाचे म्हणजे रक्तदान करून लॉटरी खरेदी केलेल्या एका दात्याला प्रथम बक्षीसही प्राप्त झाले.यंदा म्हणे तीनशे रक्तदात्यांनी रक्तदान करण्यासाठी नोंदणी केली आहे.असे मात्र समजू नका, रक्तदान केल्यास लॉटरी मोफत मिळते. रक्तदान केलेल्यांना रांगेत न राहता घरपोच लॉटरी मिळते इतकेच. इच्छित फळदेसाई यांच्या सुपीक मेंदूतून निघालेल्या योजनेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Khari Kujbuj Political Satire: कायद्याने बंदी असतानाही ‘सिंगल यूज प्लास्टिक’चा वापर काही कमी होत नाही
खरी कुजबुज: ...युरीबाब फिरू लागले!

गावातल्या गजाली..

हळदोणे मार्केट इमारत जीर्ण झाल्याने ती सोमवारपासून पाडण्यास सुरवात झाली आहे. पुढील आठवड्याभरात मॅन्युअल पद्धतीने ही पाडकाम प्रक्रिया पार पडेल. दुसरीकडे येथील विक्रेत्यांच्या पुनर्वसनप्रश्‍नी पंचायत अद्याप स्पष्टपणे पुढे आलेली नाही. पंचायत या विक्रेत्यांना कुठे जागा उपलब्ध करून देते हे पाहावे लागेल. कारण वेळीच विक्रेत्यांचे पुनर्वसन न केल्यास, याला भविष्यात राजकीय किनार मिळू शकते. अशावेळी स्थानिक पंचायत व आमदार विक्रेत्यांच्या उदारनिर्वाहाचा नाजूक विषय कशाप्रकारे मार्गी लावतात, याकडे सर्वांच्या नजरा लागून आहेत. कारण स्थानिक आमदार अ‍ॅड. कार्लुस फेरेरा आणि माजी आमदार ग्लेन टिकलो यांच्यात राजकीय वर्चस्वावरून याआधीच सुरू असलेले वाक् युद्ध सर्वश्रूत आहे. त्यात हळदोणे मार्केटची भर नको, असे लोकांना वाटते.

Khari Kujbuj Political Satire: कायद्याने बंदी असतानाही ‘सिंगल यूज प्लास्टिक’चा वापर काही कमी होत नाही
खरी कुजबुज: सुभाष फळदेसाई लेखन करणार

राज्यपालांच्या कानपिचक्या

गोवा विद्यापीठ नेहमी कोणत्या ना कोणत्या मुद्यावरून वादाच्या भोवऱ्यात असतेच. परंतु आज विद्यापीठाच्या दीक्षांत सोहळ्यात राज्यपालांनी ज्या कानपिचक्या विद्यापीठ प्रशासनाला दिल्या ते पाहता विद्यापीठ मागील ३५ वर्षांत सक्षम प्राध्यापकही घडवू शकले नाही, ही शोकांतिका उघड झाली आहे. गोवा विद्यापीठ हे ‘विद्यापीठ एके विद्यापीठ’ करत राहिले. इतर विद्यापीठांत काय चाललेय, आपण कुठे आहोत, याचे मूल्यमापन वा तौलनिक अभ्यास केलाच नाही... परंतु आता तरी राज्यपालांच्या सूचनेनंतर विद्यापीठ प्रशासनाला जाग येऊन योग्य ती पाऊले उचलली जातील, अशी अपेक्षा शिक्षणतज्ज्ञ करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com