Khandola News : बहुसंख्य जनांच्या श्रमातून निवास निर्मिती : सभापती तवडकर

Khandola News : प्रियोळ मतदारसंघातील बांधकामाची पाहणी
Khandola
Khandola Dainik Gomantak

Khandola News :

खांडोळा, हजारो कार्यकर्त्यांच्या श्रमातून दुर्बल आणि गरजूंना कायमस्वरूपी निवासाची सोय करण्यास सुरवात केली असून प्रियोळात आगामी दिड महिन्यात सहा ते सात घरांचे काम पूर्ण होईल.

ही योजना फक्त एक दोन मतदारसंघापुरती मर्यादित नसून राज्यभर राबविण्याचा मानस आहे, असे मत सभापती रमेश तवडकर यांनी व्यक्त केले.

खांडोळा आणि भोम येथे घर बांधकामाच्या पाहणीनंतर ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, की काणकोणसह केपे, सावर्डे, प्रियोळात हा उपक्रम राबविण्यात येत आहे. २७ जुलैपर्यंत २५ घरांचे काम पूर्ण होईल. भविष्यात कोणीही निवासापासून वंचित राहू नये यासाठी आपला उपक्रम असून या उपक्रमात निष्ठेने, परिश्रमपूर्व कार्य करणारे शिक्षित, उच्च पदावर कार्यरत असे हजारो कार्यकर्ते सहभागी होत आहेत.

ते निवास उभारणीसंदर्भात कोणतेही काम करतात. कोणत्याही ऋतूत शक्य ते काम करण्याची त्यांची तयारी आहे. त्यामुळे अवघ्या काही दिवसांत श्रमधाम उपक्रमातून घरे उभारली जात आहेत.

Khandola
Goa Loksabha Result 2024: एक्झिट पोलनंतर विरोधकांची मदार ‘सायलेंट’ मतदारांवर; निकाल उद्या

संस्कारातून सहकार्य

पूर्वीच्या काळात एकमेकांना सहकार्य करण्याचे संस्कार ग्रामीण पातळीवर व्हायचे. त्यातून गावातील सर्वांचा विकास समपातळीर होत होता. कोणालाही कोणतीही अडचण आली तर ती सामूहिक पद्धतीने सोडविली जात होती.

त्यामुळे कोणत्याही संकटांचा सामना केला जात होता. त्याप्रमाणे श्रमधाम योजनेतून अडचणीत सापडलेल्या गरीब, दुर्बल घटकांना कायमस्वरूपी निवास व्यवस्था करण्याचा संकल्प आम्ही केला आणि त्याला सर्व स्थरातून यश प्राप्त होत आहे, असेही तवडकर म्हणाले.

श्रमधाम ही उत्तम संकल्पना

गरजू व दुर्बल घटकांना मदतीची आवश्यता असते. अशा लोकांसाठी श्रमधाम ही उत्तम संकल्पना असून अवघ्या काही दिवसांत त्यांना पक्के घर मिळते. सेतू बांधल्याप्रमाणे निष्ठेने कार्यकर्ते काम करतात.

त्यांच्या श्रमातून उत्तम घरे निर्माण होत आहेत. प्रियोळात जवळ जवळ १५० कार्यकर्ते श्रमदान करीत आहेत. या उपक्रमातून आपल्या परिसरात काहींना आसरा मिळत आहे. त्यामुळे आमचेही या उपक्रमाला सहकार्य आहे, असे समाज कार्यकर्ते सुनिल जल्मी आणि विनय गावकर यांनी सांगितले.

Khandola
Quepem Goa News : जलप्रकल्पाआडून मिराबागमध्ये पर्यटनस्थळ नकोच! ग्रामस्थांचा विरोध

देव धावून आला...

गेली काही वर्षे पडक्या घरात राहात होते. आधार कोणाचच नाही, अशातच रमेश तवडकर बाबांनी मदतीचा हात दिला. काणकोणातून आमच्यासाठी देव धावून आला. त्यामुळे आम्हाला कायम स्वरूपी पक्के घर मिळत आहे, तवडकरांचे देव भले करो, असे शोभा आणि मिरा गावडे यांनी व्यक्त केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com