Khandola
KhandolaDainik Gomantak

Khandola News : प्रत्येकाने मातृभाषेतून शिक्षण घ्यायला हवे : प्रा. सौरभ रायकर

Khandola News : कुंभारजुवेत गणेश शिशू मंदिराचे उद्‌घाटन
Published on

Khandola News :

खांडोळा, नवीन शैक्षणिक धोरणानुसार शिक्षण क्षेत्रात खूप बदल झाले आहेत. या धोरणात प्रादेशिक भाषांना जास्त महत्त्व दिले आहे, जेणेकरून भविष्यात सर्वसामान्य विद्यार्थ्यांना त्याचा अधिक लाभ होईल.

त्यासाठी सदोदित सहकार्य राहील. आजच्या घडीला मातृभाषेतूनच शिक्षण घेणे घ्यायला हवे, कारण मातृभाषेतून शिक्षणाचा पाया भक्कम होतो, असे प्रतिपादन आसगाव अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्रा. सौरभ लक्ष्मण रायकर यांनी केले.

कुंभारजुवे येथील विद्याभारती संचालित गणेश शिशू मंदिराच्या उद्‌घाटन सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. सौरभ रायकर बोलत होते. व्यासपीठावर खास निमंत्रित उत्तर गोवा जिल्हा पंचायत अध्यक्ष सिद्धेश नाईक, सरपंच नंदकुमार शेट, विद्याभारतीचे माधव केळकर, पंचमी नाईक, पुरुषोत्तम कामत आदी उपस्थित होते.

Khandola
Goa's Environment: गोव्याचे पर्यावरण! गतवैभव, सध्यस्थिती आणि भविष्यातील आव्हाने

चांगले संस्कार बालवयात मिळाल्याने समाजात एक आदर्श नागरिक म्हणून अनेकजण नावारूपाला आले आहेत, असे मत सिद्धेश नाईक यांनी व्यक्त केले.

गणेश शिशुमंदिराचा आपण माजी विद्यार्थी असून शिक्षणाबरोबरच येथील संस्कार किती महत्त्वाचे आहेत, याचा अनुभव जीवनात आला आहे, असे सरपंच नंदकुमार शेट म्हणाले.

माधव केळकर यांनी, मातृभाषेतून शिक्षणाचे फायदे सोदाहरण सांगितले. प्रा. रायकर यांनी गणेश शिशू मंदिराचे उद्‌घाटन केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com