Yoga Day 2024 : आत्मिक शांतीसाठी योग करा : प्रताप वळवईकर

Khandola Yoga Day 2024 : बिग बी हॉल खांडोळा येथे दि.२१ रोजी योगशिबिर घेण्यात आले
Khandola Yoga Day 2024
Khandola Yoga Day 2024Dainik Gomantak

खांडोळा, आसने/प्राणायाम नित्यनेमाने केल्यामुळे आरोग्य सुदृढ राहतेच. शिवाय शरीर लवचिक होते व चेहरा तजेलदार होतो, त्यामुळे आजच्या धकाधकीच्या जीवनात योग प्राणायाम अगदी गरजेचे आहे. आत्मिक शांतीसाठी योगा करावा, असे मत प्रताप वळवईकर यांनी व्यक्त केले.

भारतीय जनता पक्ष प्रियोळ मंडळ आणि पतंजली योग समिती माशेल आयोजित योग वर्ग मायबोली कला व क्रीडा आणि सांस्कृतिक संस्था खंडोळा,

सम्राट क्लब खांडोला, सम्राट क्लब माशेल, बेतकी खांडोला स्पोर्ट्स आणि कल्चरल असोसिएशन व लॉयन्स क्लब माशेल ह्यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी २१ रोजी बिग बी हॉल खांडोळा येथे योगशिबिर घेण्यात आले.

Khandola Yoga Day 2024
Go First Airlines Crisis: आर्थिक दिवाळखोरीत असलेले 'गो फर्स्ट' पुन्हा विमानसेवा सुरु करण्याच्या तयारीत

योगासन आणि प्राणायाम शिकविण्यासाठी योगशिक्षक प्रताप वळवईकर, प्रतिभा सुर्वे, हेमा चोपडेकर उपस्थित होत्या. यावेळी आजूबाजूच्या परिसरातील ७५ योग साधक, योगप्रेमी उपस्थित होते.

कार्यक्रमाला प्रियोळ भाजप मंडळ अध्यक्ष दिलीप नाईक, हनुमंत मांजरेकर, वंदना बर्वे, सर्वेश फुलारी, शाम नाईक, मुख्याध्यापक शैलेश सावळ उपस्थित होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com