Khandepar Gram Sabha : फोंडा, कुर्टी खांडेपारची ग्रामसभा रविवारी शांततेत पार पडली. वाहतूक कार्यालय, पे पार्किंग, स्क्रॅपयार्ड, सीसीटीव्ही कॅमेरा, पंचायतने लावलेल्या फलक आदी विषयावर सभेत चर्चा झाली.
सरपंच संजना नाईक यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा झाली. यावेळी उपसरपंच विल्मा परेरा, पंच नावेद तहसीलदार, भिका केरकर, निळकंठ नाईक, परवीन बानो तहसीलदार, अभिजित गावडे, हरेश नाईक, मनीष नाईक व सजिदा सय्यद उपस्थित होते. सचिव सचिन नाईक यांनी इतिवृत्तांत वाचून दाखवला.
त्यानंतर झालेल्या चर्चेत ग्रामस्थ चंद्रकांत होळकर यांनी पंचायतने लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा प्रश्न उपस्थित केला. किती कॅमेरा चालतात आणि किती नादुरुस्त आहे,
तसेच जो कॅमेरा चोरून व एकाची तोडफोड केलेली आहे, त्यावर कोणती कारवाई केली, याबाबत विचारणा केली. रॉकी व संदीप पारकर इत्यादींनी हा प्रश्न उचलून धरला.
सरपंच नाईक यांनी यासंदर्भात तक्रार दिलेली आहे, मात्र अजून पोलिसांकडून कोणती कारवाई झालेली नाही. करारानुसार फोंडा पालिकेने कुर्टी पंचायत क्षेत्रातील कचऱ्याची उचल करायला पाहिजे. परंतु काही महिन्यांपासून कचरा उचल झालेली नाही.
याबाबतीत पंचायत मंडळाने काय उपाययोजना केली का, याबाबत ग्रामस्थांनी प्रश्न उपस्थित केला. संदीप पारकर यांनी या विरोधात कायदेशीर कारवाई करण्याच्या मागणी केली.
याबाबत कायदा सल्लागाराकडून अहवाल आल्यानंतर पुढील कृती ठरवण्यात येईल, असे आश्वासन सरपंचांनी दिले. कायदा सल्ला देणारा जो माणूस पंचायतने नेमलेला आहे तो दिरंगाई करीत असल्यास दुसऱ्याची नेमणूक करावी असा मागणी यावेळी ग्रामस्थांनी केली.
फलकावरून गोंधळ
खांडेपार येथे ट्रक पार्किंगसंदर्भात फलक लावण्यात आले आहेत, परंतु त्या सर्व फलकांची स्थिती हलाखीची झाली आहे. मात्र त्याकडे कोणाचे लक्ष नाही.
परिणामी पंचायतीचा पैसा वाया गेला आहे, ही बाब चंद्रकांत होळकर यांनी निदर्शनास आणून दिली व संबंधितांना दंड ठोठवावा असे सांगितले.
यावेळी पंच हरीश यांनी हरकत घेत कुठल्या व्यक्तीला दंड ठोठवावा ते आदी सांगावे, काहीही वक्तव्य करू नये असे सांगितले. तेव्हा काहीसा गोंधळ निर्माण झाला.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.