Keri News : केरीतील लोकांचे आरोग्य धोक्यात; फुटलेल्या जलवाहिनीत घुसते दूषित पाणी

Keri News : चार ठिकाणी फुटलेल्या जलवाहिनीत घुसते दूषित पाणी
Keri
KeriDainik Gomantak

Keri News :

पर्ये, भूमिगत वीज वाहिनीसाठी खोदकाम करताना चार ठिकाणी फोडण्यात आलेल्या जलवाहिनी अद्याप दुरुस्ती न केल्याने सत्तरीतील धनगरवाडा, केरी भागात रोज शेकडो लिटर पाणी वाया जात आहे.

तसेच बाहेरीलवाडा येथे रस्त्याच्या बाजूला जलवाहिनी फुटल्याने पाण्याची नासाडी होत आहे. दरम्यान या जलवाहिनीत दूषित पाणी घुसत असल्याने येथील लोकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

या प्रकाराला आता दोन आठवडे उलटले असून खोदकाम करणारा कंत्राटदार तसेच सरकारच्या संबंधित विभागानेही याकडे दुर्लक्ष केले आहे. चार ठिकाणी ही जलवाहिनी फुटली असतानाही या जलवाहिनीतून पाणी पुरवठा केला जातो.

परंतु जेव्हा पाणी पुरवठा बंद होतो तेव्हा बाहेर साचलेले दूषित पाणी फुटलेला जलवाहिनीत जाते, त्यामुळे या परिसरातील लोकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. संबंधितांनी तातडीने याकडे लक्ष वेधून त्वरित दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.

Keri
Lala Ki Basti Goa: 'लाला की बस्ती'तून 96 जणांना अटक; कोलवाळ पोलिसांची भाडेकरुंची तपास मोहीम

रस्ता बनला धोकादायक :

भूमिगत वीज वाहिनीसाठी येथील रस्ता खोदला आहे. खोदलेला चरही व्यवस्थित बुजविलेला नसल्याने हा रस्ता धोकादायक झाला आहे.

पावसाळ्यात हा रस्ता आणखी धोकादायक ठरणार आहे या मार्गावरून केरी सरकारी माध्यमिक विद्यालयाची शाळकरी मुलांना नेणारी कदंब बस नियमित येते. ही बससेवाही कोलमडण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुलांची मोठी गैरसोय होणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com