Indian Super League: गतउपविजेत्यांची मोहीम आजपासून

केरळा ब्लास्टरची आज ईस्ट बंगालविरुद्ध लढत
Indian Super League
Indian Super LeagueDainik Gomantak
Published on
Updated on

कोची: गतउपविजेत्या केरळा ब्लास्टर्स आणि ईस्ट बंगाल यांच्यातील लढतीने 2022-23 मोसमातील इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेल शुक्रवारपासून (ता. 7) सुरवात होत आहे. फुटबॉलप्रेमींच्या पुनरागमनामुळे स्टेडियमवर पुन्हा जल्लोष होणार असून मोसमातील पहिला सामना कोची येथील जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर खेळला जाईल.

(Kerala Blasters will face East Bengal in the Indian Super League)

Indian Super League
Goa Zilla Panchayat Election: कुठ्ठाळी मतदारसंघातून तीन उमेदवारांचे अर्ज सादर

गतमोसमातील अंतिम लढतीत केरळा ब्लास्टर्सला पेनल्टी शूटआऊटवर हरवून हैदराबाद एफसीने आयएसएल करंडक जिंकला होता. एकंदरीत तीन वेळा केरळच्या संघाला आयएसएल स्पर्धेत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले आहे. ईस्ट बंगालला मागील मोसमात साखळी फेरीत तळाचा अकरावा क्रमांक मिळाला होता.

व्हुकोमानोव्हिच यांचा सावध पवित्रा

केरळा ब्लास्टर्सचे इव्हान व्हुकोमानोव्हिच यांचा मुख्य प्रशिक्षक या नात्याने यंदा दुसरा मोसम आहे. त्यांनी पहिल्या लढतीपूर्वी सावध पवित्रा घेतला. ते म्हणाले, ‘‘आम्ही ईस्ट बंगालला कमी लेखण्याची चूक करणार नाही. ड्युरँड कप स्पर्धेत त्यांनी योग्यता सिद्ध केली आहे. त्यांच्याकडे चांगला प्रशिक्षक आहे, चांगला संघ आहे आणि मी सांगितल्याप्रमाणे आयएसएलमधील प्रत्येक संघ एकमेकाला पराभूत करण्याची क्षमता राखतो. त्यामुळे ईस्ट बंगालविरुद्धची लढत सोपी असेल, असे ज्यांना वाटते ते चुकीचे आहे. त्यामुळे आम्हालाही ताकदीने खेळायला हवं.’’

Indian Super League
Goa: सीनियर महिला टी-20 क्रिकेट स्पर्धेसाठी महिला संघाच्या कर्णधारपदी शिखा पांडे कायम

कॉन्स्टंटाईन यांचे पुनरागमन

स्टीफन कॉन्स्टंटाईन यापूर्वी भारताच्या सीनियर राष्ट्रीय फुटबॉल संघाचे प्रशिक्षक होते, आता ते भारतीय फुटबॉलमध्ये ईस्ट बंगालचे मुख्य प्रशिक्षक या नात्याने पुनरागमन करत आहेत. गतमोसमात ईस्ट बंगालला वीसपैकी फक्त एकच सामना जिंकता आला. यावेळी संघ चांगली कामगिरी बजावेल हा विश्वास कॉन्स्टंटाईन यांना वाटत आहे. ‘‘मी सहा आठवड्यांपूर्वी आलो, तेव्हा संघात 12 खेळाडू होते. आता आमच्याकडे 26 ते 27 खेळाडूंचा संच आहे. त्यांनी आतापर्यंत खूप मेहनत घेतली आहे. पण, आपण किती चांगले किंवा किती वाईट आहोत हे उद्या कळेल. मी वचन देतो की उद्याचा सामना हरण्यासाठी आम्ही आलेलो नाही,’’ असे कॉन्स्टंटाईन यांनी ठासून सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com