फोंडा : मडकई मतदारसंघातील कवळे व दुर्भाट पंचायतींतील पंचसदस्यांनी या मतदारसंघाचे आमदार, मगोचे नेते व राज्याचे वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांची भेट घेतली. यावेळी माधवराव ढवळीकर ट्रस्टचे मिथिल ढवळीकर उपस्थित होते.
कवळे पंचायतीचे नूतन पंचसदस्य सुशांत कपिलेश्वरकर, मनुजा नाईक, सोनाली तेंडुलकर, प्रिया डोईफोडे, विठोबा गावडे, सत्वशीला नाईक तसेच दुर्भाट पंचायतीच्या अमृता नाईक, चंदन नाईक, शिवदास गावडे, दीपा नाईक, क्षिप्रा आडपईकर व गौरीश नाईक उपस्थित होते. या सर्वांनी आमदार ढवळीकर यांचे आभार मानले व त्यांच्या मार्गदर्शनाखाली पंचायतीचा विकास करू असे पत्रकारांशी बोलताना सांगितले.
दरम्यान, राज्यातील 186 पंचायतींची अटीतटीची निवडणूक पार पडून 5038 उमेदवारांमधून 1528 पंचसदस्य अखेर निवडून आले. मुख्यमंत्री, मंत्री, आमदार आणि समर्थकांबरोबरची फोटोग्राफीही थंडावली आहे. आता सर्वांनाच सरपंच आणि उपसरपंच पदाचे वेध लागले असून या निवडीसाठी आठ दिवसांचा अवधी मिळाल्याने लॉबिंग वाढले आहे.
हाती आलेल्या निकालांमधून भाजप समर्थकांची संख्या लक्षणीय असून विरोधकांना पंचायत निवडणुकीमध्ये आपली छाप पाडता आली नाही. आता उरली-सुरली सरपंच, उपसरपंच पदेही भाजप आपल्या खिशात टाकणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.