Goa Drugs Case: सापळा रचून कर्नाटकातील युवकाला गांजासह अटक; डिचोली पोलिसांची कारवाई

Goa Crime: अटक केलेला मूळ कर्नाटकमधील संशयित युवकाचे नाव शाहिर राजासाब शयनवार असे आहे
Goa Crime: अटक केलेला मूळ कर्नाटकमधील संशयित युवकाचे नाव शाहिर राजासाब शयनवार असे आहे
Arrest|Jail|CrimeCanva
Published on
Updated on

Bicholim Drugs Case

डिचोली: अमलीपदार्थविरोधी मोहिमेंतर्गत डिचोली पोलिसांनी केलेल्या कारवाईत ९० ग्रॅम गांजासह एका ३४ वर्षीय युवकाला अटक केली आहे. त्‍याची स्कूटरही पोलिसांनी जप्त केली. आज सोमवारी शहरातील बसस्थानक परिसरात पोलिसांनी छापा टाकून ही कारवाई केली.

अटक केलेला मूळ कर्नाटकमधील संशयित युवकाचे नाव शाहिर राजासाब शयनवार असे आहे. सध्‍या तो डिचोलीतील आयडीसी येथे राहतो. उत्तर गोव्याचे पोलिस अधीक्षक अक्षत कौशल, डिचोलीचे पोलिस उपअधीक्षक सागर एकोस्कर आणि निरीक्षक दिनेश गडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांच्या ही कारवाई केली.

Goa Crime: अटक केलेला मूळ कर्नाटकमधील संशयित युवकाचे नाव शाहिर राजासाब शयनवार असे आहे
Goa Drugs Case: नायजेरियन नागरिकाला न्यायालयाचा दणका! ड्रग्जतस्करी प्रकरणात जामीन फेटाळला

पोलिसांनी सापळा रचून ही कारवाई केली.

पोलिस उपनिरीक्षक विकेश हडफडकर आणि आपा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हवालदार नीलेश फोगेरी, दयेश खांडेपारकर, धनिश शेख, अनिकेत परब आणि मयूर आसोलकर या पोलिसांनी कारवाईत सहभाग घेतला. तपास सुरू आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com