Karnataka Tourist Death Case: कॅसिनोत ओळख, नंतर मोहजाल... मोबाईल लोकेशनमुळे अक्षता जाळ्यात, संदीपच्या मृत्यूची कल्पना नसल्याने मोबाईल 'ऑन': बंगळुरूमध्ये अटक

Akshata arrested Bengaluru: कॅसिनोमध्ये धनाढ्य पर्यटकांशी ओळख वाढवून त्यांना आपल्या मोहजालात अडकवणाऱ्या संशयित महिलेपर्यंत अखेर पोलिस पोहोचले.
Karnataka Tourist Death Case
Karnataka Tourist Death CaseDainik Gomantak
Published on
Updated on

म्हापसा: कॅसिनोमध्ये धनाढ्य पर्यटकांशी ओळख वाढवून त्यांना आपल्या मोहजालात अडकवणाऱ्या संशयित महिलेपर्यंत अखेर पोलिस पोहोचले. उडुपी येथील वॉटर स्पोर्ट्स व्यावसायिक संदीप सलायम (४२) यांच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणातील फरार मुख्य संशयित अक्षता एम. के. (३५, मूळची मंगळूरू) हिला कळंगुट पोलिसांनी बंगळुरूमधून अटक केली. विशेष म्हणजे, संदीप यांचा मृत्यू झाल्याची कल्पना नसल्याने तिने मोबाईल बंद केला नाही आणि त्याच मोबाईलच्या लोकेशनवरून पोलिसांनी तिचा माग काढत अखेर मुसक्या आवळल्या.

कर्नाटक पोलिसांच्या मदतीने बंगळुरू येथे ही कारवाई करण्यात आली. संशयित महिलेला ट्रान्झिट रिमांडवर घेण्यात आले असून, शुक्रवारी-शनिवारी मध्यरात्री तिला गोव्यात आणण्यात येणार आहे. शनिवारी (ता. ४) सकाळी तिला म्हापसा न्यायालयात हजर केले जाणार आहे.

पोलिसांनी संशयित अक्षताच्या मोबाईल क्रमांकाच्या लोकेशनवरून तिचा माग काढला. तिला ताब्यात घेतल्यानंतर आता सखोल चौकशी होणार असून, या गुन्ह्यामागील संपूर्ण कटकारस्थानाचा उलगडा होण्याची शक्यता आहे.

Karnataka Tourist Death Case
Goa Yellow Alert: गोव्यात पुढचे 7 दिवस मुसळधार; हवामान खात्याकडून 'यलो अलर्ट' जारी! VIDEO

प्राथमिक माहितीनुसार, अक्षताने संदीप यांना रिसॉर्टच्या खोलीत काहीतरी गुंगी आणणारे किंवा मादक पदार्थ दिले. त्यामुळे ते बेशुद्ध पडले आणि त्यानंतर हॉटेलच्या खोलीतच त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर संशयित महिलेने त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी आणि पाकीट घेऊन घटनास्थळावरून पलायन केले. मात्र, संदीप यांचा मृत्यू झाल्याची कल्पना नसल्याने तिने स्वतःचा मोबाईल सुरूच ठेवला. पोलिसांसाठी हाच सर्वात महत्त्वाचा धागा ठरला.

संदीप यांच्या मृत्यूनंतर संशयित महिला गोव्यातून फरार झाली होती. ती बंगळुरूच्या दिशेने गेल्याची गुप्त माहिती मिळताच कळंगुट पोलिसांचे विशेष पथक बुधवारी (ता. १) कर्नाटकात रवाना झाले होते. स्थानिक पोलिसांच्या मदतीने सलग तीन दिवस रात्रंदिवस शोधमोहीम राबविल्यानंतर शुक्रवारी तिला ताब्यात घेण्यात आले.

पोलिसांच्या मते, चौकशीत अनेक महत्त्वाचे खुलासे होण्याची शक्यता आहे. संदीप यांना नेमके कोणते गुंगीचे औषध देण्यात आले, या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, तसेच यामागे एखादे संघटित रॅकेट कार्यरत आहे का, याचाही तपास होणार आहे.

Karnataka Tourist Death Case
Goa Water Storage: गोव्यात पाण्याचा अपव्यय करणाऱ्यांवर बसणार लगाम; भूजल पातळी टिकवण्यासाठी जलसंपदा विभाग ॲक्शन मोडमध्ये

कॅसिनोत ओळख, नंतर मोहजाल...

संशयित अक्षता कॅसिनोमध्ये येणाऱ्या आर्थिकदृष्ट्या सक्षम व्यक्तींशी ओळख वाढवत असे. त्यानंतर त्यांना आपल्या जाळ्यात ओढून त्यांची फसवणूक किंवा लूट केल्याचा संशय पोलिसांना आहे. या प्रकरणातही संदीप सलायम तिच्या संपर्कात आले आणि त्यानंतर ही धक्कादायक घटना घडली. या पार्श्वभूमीवर अशा प्रकारच्या आणखी घटना घडल्या आहेत का, याचाही पोलिस तपास सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com