goa
goaDainik Gomantak

Karnataka Sex Scandal Case : कर्नाटकातील सेक्स स्कँडल प्रकरणाचा गोव्यावर परिणाम नाही : सदानंद तानावडे

Karnataka Sex Scandal Case : यावेळी व्यासपीठावर मंत्री रोहन खंवटे, उपसभापती जोशुआ डिसोझा, आमदार केदार नाईक, माजी आमदार दयानंद सोपटे, सिद्धार्थ कुंकळ्येकर हजर होते.

Karnataka Sex Scandal Case :

म्हापसा लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत कर्नाटकातील प्रज्ज्वल रेवण्णा कथित सेक्स स्कँडलमुळे देशभर खळबळ माजली आहे. रेवण्णा हे जनता दल सेक्युलर (जेडीएस) पक्षाचे असून हा एनडीएचा घटक पक्ष आहे.

त्यामुळे विरोधकांकडून भाजपला टार्गेट केले जात आहे. यावर माध्यमांनी प्रश्न केला असता राज्यसभा खासदार तथा भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे उत्तरले की, मुळात रेवण्णा हे भाजपचे नाहीत, ते जेडीएसचे नेते.

आणि लोकसभा निवडणूक ही राष्ट्रीय पातळीवर विविध मुद्यांवर होते. त्यामुळे रेवण्णांचा विषय त्यांच्या ठराविक मतदारसंघापूर्ता प्रभावित होऊ शकतो. त्याचा गोव्यावर परिणाम होणार नाही, असे स्पष्टीकरण तानावडेंनी म्हापशातील पत्रकार परिषदेत दिली.

goa
Mysterious Artefact Found In Goa: पणजीत आढळलेल्‍या मूर्तीवर करणार कार्बन प्रक्रिया : नीलेश फळदेसाई

यावेळी व्यासपीठावर मंत्री रोहन खंवटे, उपसभापती जोशुआ डिसोझा, आमदार केदार नाईक, माजी आमदार दयानंद सोपटे, सिद्धार्थ कुंकळ्येकर हजर होते.

सदानंद तावाडे म्हणाले की, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उत्तर व दक्षिणेत भाजपाच्या दोन प्रचाराच्या फेऱ्या पूर्ण झाल्या. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात ३ मे रोजी, सायंकाळी ५वाजता म्हापसा नवीन केटीसी बसस्थानकावर गृहमंत्री अमित शहांची जाहीर सभा होईल. या सभेला २० ते २५ हजार लोकांची उपस्थितीसाठी व्यवस्था केली जाईल

खलपांचे आरोप बिनबुडाचे

काँग्रेसचे उत्तर गोवा उमेदवार अ‍ॅड.

रमाकांत खलप यांनी म्हापसा अर्बन बँक बुडण्यास स्व. मनोहर पर्रीकर यांना जबाबदार धरले असा प्रश्न केला असता तानावडे म्हणाले की, मुळात ही बँक खलपांची होती. त्यांनी लोकांना सरसकट कर्ज दिले. मग कर्जाची पुनर्प्राप्तीची जबाबदारी त्यांचीच होती. त्यामुळे खलपांना तत्कालिन सरकार व पर्रीकरांवर आरोप करण्याचा अधिकार नाही.

बंजारा परिषदेच्या वतीने पाठिंबा

दरम्यान, यावेळी अखिल भारतीय बंजारा परिषदेच्या वतीने महासचिव अ‍ॅड. पंडित राठोड यांनी परिषदचा जाहिर पाठिंबा भाजपाला दिला. राठोड म्हणाले की, गोव्यात ५०हजार बंजारा मतदार आहेत.

तर देशात १५कोटींची बंजारा समाजाची लोकसंख्या आहे. गोव्यातील भाजपाच्या दोन्ही उमेदवारांना आम्ही पाठिंबा देत असून, भाजप सत्तेत येताच सरकारने बंजारा समाजातील कार्यकर्त्यांना राज्य सत्तेवर घ्यावे, अशी विनंती त्यांनी केली. तसेच बंजारा समाजाच्या भाषेला राज्यदरबारी मान्यता मिळावी यासाठी प्रयत्न करावे.

goa
Goa Congress: पर्रीकरांनी विश्वास घातकी म्हटले त्याच गॉडमनला भाजपात प्रवेश; मोदी परिवारात देशद्रोही लोक - पाटकर

एनडीएने पंतप्रधानासाठी नरेंद्र मोदींचा चेहरा दिलाय. उलट इंडिया आघाडीने आपला पंतप्रधान कोण ते सांगावे. एनडीएच्या नेत्याकडे दूरदृष्टी आहे. मागील दहा वर्षांत मोदींनी स्थिर सरकार व खऱ्याअर्थाने देशाचा विकास केला आणि मोदी सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले नाहीत. -

सदानंद शेट तानावडे, राज्यसभा खासदार

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com