Mhadei: म्हादई नदीवरील प्रकल्पासाठी कर्नाटक आग्रही, केंद्राकडे मंत्र्यांच्या पायघड्या

म्हादई पेयजल’ प्रकल्पाल
Mhadei River
Mhadei RiverDainik Gomantak
Published on
Updated on

कर्नाटकचे पाटबंधारे मंत्री गोविंद कारजोळ यांनी आज म्हादई नदीवरील प्रकल्प मंजूरीबाबत केंद्रीय मंत्र्यांची भेट घेतली आहे. या भेटीत केंद्रीय जल मंत्री गजेंद्र सिंह यांनी सकारात्मकता दर्शवल्याची माहिती कारजोळ यांनी दिली.

(Karnataka Irrigation Minister Govind Karjol meets central ministers to approval for Mhadei river water project)

मिळालेल्या माहितीनुसार कर्नाटकचे पाटबंधारे मंत्री गोविंद कारजोळ यांनी केंद्रीय संसदीय कार्य मंत्री प्रल्हाद जोशी आणि केंद्रीय जलमंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांची दिल्ली येथे भेट घेतली आहे.

या भेटीदरम्यान कारजोळ यांनी शेखावत यांच्याकडे म्हादई नदीवरील ‘महत्त्वाकांक्षी पेयजल’ प्रकल्पाला मंजुरी देण्यासाठी प्रस्ताव ठेवला आहे. याला सकारात्मकपणे घेत मंत्री शेखावत यांनी म्हादई समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं आश्वासन दिले आहे.या चर्चेदरम्यान कर्नाटक राज्यातील इतर प्रलंबित समस्यांबाबत चर्चा केली असल्याची माहिती कारजोळ यांनी दिली आहे.

म्हादई जलतंटा प्रकरण न्यायप्रविष्ट

म्हादई जलतंटा प्रकरण हे सध्या न्यायप्रविष्ट असून यामूद्यावरुन गोवा सरकार आणि विरोधी पक्षांमध्ये आरोप - प्रत्यारोपाच्या फैरी झडत असतात. गेल्या काही दिवसांपूर्वी कर्नाटक राज्याने म्हादई खोऱ्यात पाणी वळविण्यासाठी यंत्रसामग्री आणून ठेवली असून मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आपल्या राजकीय स्वार्थासाठी म्हादई कर्नाटकला विकली का? असा सवाल गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी केला होता. त्यामूळे कर्नाटकच्या या भुमिकेवरुन गोवा राज्यात वादंग उठणार का ? हे पहावे लागणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com