कर्नाटक सरकारचे नवीन एस.ओ.पी गोवेकरांसाठी अन्यायकारक...

कर्नाटक सरकारने करोना विषयक बुधवारी (ता.5) रात्री नवीन एस.ओ.पी जाहीर केल्याने गोव्यातून कर्नाटकात जाणाऱ्या प्रवाशांची गोची झाली आहे.
Karnataka New Covid Guidelines कर्नाटक सरकारने नवीन एस.ओ.पी जाहीर केल्याने गोव्यातून कर्नाटकात जाणाऱ्या प्रवाशांची झालेली माजाळी तपासणी नाक्यावर झालेली गर्दी.

Karnataka New Covid Guidelines कर्नाटक सरकारने नवीन एस.ओ.पी जाहीर केल्याने गोव्यातून कर्नाटकात जाणाऱ्या प्रवाशांची झालेली माजाळी तपासणी नाक्यावर झालेली गर्दी.

Dainik Gomantak 

काणकोण: कर्नाटक सरकारने करोना विषयक बुधवारी (ता.5) रात्री नवीन एस.ओ.पी जाहीर (Karnataka New Covid Guidelines) केल्याने गोव्यातून कर्नाटकात जाणाऱ्या प्रवाशांची गोची झाली आहे. माजाळी तपासणी नाक्यावर करोना लसीकरणाचे दोन डोस घेतलेल्यांनाही कर्नाटकात प्रवेश करण्यासाठी आरटीपीसीआर सक्तीचे केल्याने अडवणूक होत आहे.मात्र कर्नाटकातून गोव्यात प्रवेश करण्यासाठी दोन डोस घेतलेल्यांना सरळ प्रवेश देण्यात येत हा गोवेकरांवर कर्नाटकात जाणाऱ्या प्रवाश्यांवर सरळ सरळ अन्याय असल्याचे लोलयेचे सरपंच सचिन नाईक यांनी सांगितले.

कर्नाटकातील (Karnataka) कोविड पॉझीटिव्ह (Covid-19) रूग्णसंख्येचा एकूण आकडा

देशात झपाट्याने वाढणाऱ्या कोविड पॉझीटिव्ह (Covid-19) रूग्णसंख्येचा विचार करता अनेक राज्यांमध्ये कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. गोवा (Goa) शेजारील कर्नाटक (Karnataka) राज्यात मंगळवारी 2,479 कोविड रूग्ण आढळले असून चार जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकून संक्रमित आणि मृत्यूंची संख्या अनुक्रमे 30,13,326 आणि 38,355 वर पोहोचली आहे, असे कर्नाटक आरोग्य विभागाने सांगितले.

<div class="paragraphs"><p>Karnataka New Covid Guidelines कर्नाटक सरकारने नवीन एस.ओ.पी जाहीर केल्याने गोव्यातून कर्नाटकात जाणाऱ्या प्रवाशांची झालेली माजाळी तपासणी नाक्यावर झालेली गर्दी.</p></div>
कन्हैया कुमारच्या नेतृत्वाखाली उद्या राजभवनवर धडक मोर्चा

कर्नाटकातील नवीन मार्गदर्शक तत्त्वांची यादी

 • पुढील दोन आठवडे संपूर्ण राज्यात रात्री 10 ते पहाटे 5 वाजेपर्यंत नाईट कर्फ्यू लागू राहणार आहे. या कालावधीत सर्व कार्यालये सोमवार ते शुक्रवार आठवड्यातून 5 दिवस सुरू असतील

 • सरकारी सचिवालय एकूण कामकाजाच्या 50 टक्के अधिकाऱ्यांसह चालेल.

 • बेंगळुरू मेट्रो रेल कॉर्पोरेशन (BMRCL) सह सार्वजनिक वाहतूक आठवड्याच्या शेवटी कर्फ्यू दरम्यान आपत्कालीन कारणांसाठी लोकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार काम करेल.

 • पब, क्लब, रेस्टॉरंट, बार, हॉटेल्स, हॉटेल्समधील खाण्याची ठिकाणे इत्यादी 50 टक्के आसन क्षमतेसह सुरू राहतील मात्र या ठिकाणी कोविड नियमांचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक असून केवळ लसीकरण झालेल्या व्यक्तींनाच आवारात प्रवेश दिला जाईल.

 • खुल्या जागेवर 200 पेक्षा जास्त लोक आणि बंद ठिकाणी 100 लोकांचा समावेश नसलेल्या विवाह सोहळ्यांना परवानगी आहे.

 • धार्मिक स्थळे केवळ दर्शनासाठी उघडण्यास परवानगी आहे.

 • मॉल, शॉपिंग कॉम्प्लेक्स, सर्व स्टँड-अलोन दुकाने आणि आस्थापना आठवड्याच्या दिवसात नेहमीप्रमाणे चालू राहतील.

 • जलतरण तलाव आणि व्यायामशाळा 50 टक्के चालवण्यास परवानगी आहे, परंतु प्रवेश पूर्णपणे लसीकरण झालेल्या व्यक्तींसाठी मर्यादित असेल.

 • क्रीडा संकुल आणि स्टेडियमला 50 टक्के क्षमतेने काम करण्याची परवानगी आहे.

 • सर्व मोर्चे, धरणे, आंदोलने करण्यास मनाई आहे.

 • आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभाग, सरकार यांनी जारी केलेल्या प्रचलित परिपत्रक/मार्गदर्शक तत्त्वांनुसार केरळ, गोवा आणि महाराष्ट्राच्या सीमेवर कर्नाटक सरकारची पाळत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com