Tiswadi News : करमळीतील बांधाला भगदाड; ५ कोटी खर्च पाण्यात

Tiswadi News : याच वर्षी जानेवारी महिन्यात या बांधाचे काम पूर्ण करण्यात आले होते, परंतु अवकाळी पावसाच्या पहिल्याच तडाख्यात या बांधाचा एक भाग कोसळला.
Tiswadi
TiswadiDainik Gomantak
Published on
Updated on

Tiswadi News :

तिसवाडी, तालुक्यातील खाजन शेती सध्या चर्चेत आहे. नेवरानंतर आता करमळी येथील एक प्रकरण उघडकीस आले आहे.

करमळीतील कुव्हाळ-कातोर येथे सुमारे पाच कोटी रुपये खर्च करून बांधलेल्या बांधाला सहा महिन्यांच्या आत भगदाड पडले आहे. निकृष्ट दर्जाचे काम केल्याने हा प्रकार घडल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत.

याच वर्षी जानेवारी महिन्यात या बांधाचे काम पूर्ण करण्यात आले होते, परंतु अवकाळी पावसाच्या पहिल्याच तडाख्यात या बांधाचा एक भाग कोसळला.

Tiswadi
Flights To Goa: छत्रपती संभाजीनगर ते गोवा थेट विमानसेवेची घोषणा, जूनपासून आठवड्याला तीन फ्लाईट्स

यासंदर्भात कार्यकारी अभियंता आर. व्ही. केनावडेकर यांनी सांगितले की, हा बांध आधुनिक पद्धतीने बांधण्यात आला होता. बांधाला भगदाड पडल्याची सूचना मिळाल्यानंतर लगेच तेथे माती टाकली आहे. बांधाचे दुरुस्ती काम केले जाणार असून याचा खर्च कंत्राटदार करणार आहे.

बांध सहा महिन्यांच्या आत फुटल्याने हे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचे सिद्ध झाले आहे. या बांधकामात असंख्य त्रुटी असून बांधाला आणखीही भगदाड पडण्याची शक्यता आहे. असे झाल्यास सभोवतीच्या गावांत नदीचे पाणी शिरणार आहे.

सुनील नाईक, ग्रामस्थ, करमळी

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com