Goa University LLB
Goa University LLB Dainik Gomantak

LLB Admission Scam : चौकशी अहवाल उद्या होणार सादर

‘एनएसयुआय’चे पदाधिकारी संचालकांना भेटणार
Published on

Kare College Of Law Goa : आपल्या मुलाच्या फायद्यासाठी बीए एलएलबी अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षाच्या प्रवेशाची प्रक्रियाच बदलणारे कारे कायदा महाविद्यालयाचे वादग्रस्त प्राचार्य डॉ. साबा दा सिल्वा यांच्याविरोधात सुरू असलेल्या चौकशीचा अहवाल सोमवारी (17 जुलै) विद्यापीठाला सादर केला जाणार आहे.

Goa University LLB
LLB Admission Scam : ‘कारे’च्या प्राचार्यांनी स्वतःच बदलली गुणपद्धत

डॉ. सविता केरकर यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या या चौकशी समितीने हाती घेतलेली ही चौकशी पूर्ण झाली असून कारे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दा सिल्वा यांनी विद्यापीठाची परवानगी न घेताच ही प्रवेश प्रक्रिया स्वतःच्या निर्णयाने बदलली, हे चौकशीत सकृतदर्शनी सिद्ध झाले आहे.

या चौकशीदरम्यान डॉ. दा सिल्वा यांच्यासह साळगावकर कायदा महाविद्यालयाचे प्राचार्य आणि या परीक्षा प्रक्रियेत सहभागी असलेल्या शिक्षकांच्या जबान्या या समितीने नोंदवून घेतल्या होत्या.

शिक्षण व्यवस्थेत कोणी मनमानी करत असेल तर त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी आज ‘गोमन्तक टीव्ही’ने आयोजित केलेल्या चर्चेवेळी करण्यात आली.

काय कारवाई होणार?

सोमवारी ‘एनएसयुआय’ या विद्यार्थी संघटनेचे पदाधिकारी उच्च शिक्षण संचालक प्रसाद लोलयेकर यांची भेट घेऊन या चौकशीचे काय झाले, दोषींवर कोणती कारवाई करणार, याबद्दल त्यांना विचारणार असल्याची माहिती नौशाद चौधरी यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com