Goa Road: करासवाडा-चार रस्त्यावरील ‘सर्व्हिस रोड’ची डागडुजी सुरू

Bardez News: ‘गोमन्तक’च्या वृत्ताची दखल : ‘साबांखा’कडून काम
Bardez News: ‘गोमन्तक’च्या वृत्ताची दखल : ‘साबांखा’कडून काम
Karaswada Bardez Goa road Dainik Gomantak
Published on
Updated on

करासवाडा-म्हापसा चार रस्त्याच्या उड्डाणपुलाखालील सर्व्हिस रोडवर मोठमोठे खड्डे पडून हा रस्ता वाहतुकीसाठी धोक्याचा झाला होता. याचे वृत्त ‘दैनिक गोमन्तक’मध्ये यापूर्वी प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेऊन सार्वजनिक बांधकाम खात्याच्या म्हापसा विभागाकडून त्या खड्ड्यांत दगड व माती घालून ते बुजविण्याचे काम सुरू केले आहे.

या सर्व्हिस रोडवरून रात्रंदिवस हजारो दुचाकी, चारचाकी व अवजड वाहने ये-जा करतात. पणजी, मडगाव, वास्को व इतर ठिकाणी जाणारी जी वाहने आहेत ती उड्डाणपुलावरून जातात; परंतु आतील भागामध्ये जात असलेली वाहने या सर्व्हिस रोडवरून जातात.

मुंबई, गुजरात, दिल्लीवरून गोव्यामधील औद्योगिक वसाहतीमध्ये जाण्यास काही अवजड वाहने साहित्य घेऊन येतात तीही याच मार्गे जात असल्याने हा मार्ग धोक्याचा बनलेला आहे.

दोन दिवसांपूर्वीच पहाटेच्या वेळी विनायक धारगळकर (७८, आकय -करासवाडा) येथील रस्त्याच्या बाजूने जात होते. त्यांना एका अज्ञात वाहनाने धडक दिल्याने ते खाली पडून त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागला आणि जागीच ठार झाले. तसेच या मार्गावर अनेक अपघात होतात.

प्रशासनाचे याकडे दुर्लक्षच!

वाहनचालक सचिन किटलेकर यांनी सांगितले की, हा मार्ग म्हणजे अपघाताचा रस्ता झालेला आहे. या सर्व्हिस रोडकडे म्हापसा पालिका ढुंकूनही पाहत नाही किंवा ज्याच्याकडे ही जबाबदारी आहे तो म्हापसा सार्वजनिक बांधकाम खात्याचा विभागही लक्ष देत नाही. आम्हाला या मार्गावरून ये-जा करताना भीती वाटते. त्यामुळे या रोडची डागडुजी लवकरात लवकर करणे गरजेचे होतेच.

Bardez News: ‘गोमन्तक’च्या वृत्ताची दखल : ‘साबांखा’कडून काम
Bardez News : हॉटेलमधील ‘अनैतिकते’वर नियंत्रण ठेवा; पोलिस निरीक्षक निखिल पालेकर यांचा इशारा

सुशांत हरमलकर, उपनगराध्यक्ष, म्हापसा पालिका

येथील खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचून तळ्याचे स्वरूप प्राप्त झालेले आहे. आपण यासाठी म्हापसा मतदारसंघाचे आमदार जोशुआ डिसोझा आणि म्हापसा सार्वजनिक बांधकाम खात्याच्या विभागाच्या अभियंत्यांकडेही बोलणी केली. या ठिकाणी पेव्हर्स बसविणे तसेच पावसानंतर हॉटमिक्स डांबरीकरण करण्याचीही मागणी केली. तसेच या ठिकाणी गटार नसल्याने पाणी रस्त्याच्या मधोमध साचून राहते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com