Karapur - Sarvan News : कारापूर-सर्वणच्या उपसरपंचपदी उज्ज्वला कवळेकर यांची निवड

Karapur - Sarvan News : बुधवारी (ता.२२) झालेल्या निवडणुकीत त्यांची बिनविरोध निवड झाली आहे.
Karapur - Sarvan Gram Panchayat Election 2023 Ujjwala Kavalekar as unopposed deputy sarpanch
Karapur - Sarvan Gram Panchayat Election 2023 Ujjwala Kavalekar as unopposed deputy sarpanchDainik Gomantak
Published on
Updated on

Karapur - Sarvan News : डिचोली कारापूर-सर्वण पंचायतीच्या उपसरपंचपदाची माळ उज्ज्वला कवळेकर यांच्या गळ्यात पडली आहे. बुधवारी (ता.२२) झालेल्या निवडणुकीत त्यांची बिनविरोध निवड झाली आहे.

तन्वी सावंत यांनी उपसरपंचपदाचा राजीनामा दिल्याने उपसरपंचपद रिक्त झाले होते. उपसरपंचपदाची निवडणूक घेण्यासाठी बुधवारी पंचायत मंडळाची बैठक बोलविण्यात आली होती.

Karapur - Sarvan Gram Panchayat Election 2023 Ujjwala Kavalekar as unopposed deputy sarpanch
Goa BJP: भाजप युवा मोर्चातर्फे साव्हियो कुतिन्होविरोधात तक्रार

सरपंच दत्तप्रसाद खारकांडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीस सात पंचसदस्य उपस्थित होते. तर एक पंचसदस्य अनुपस्थित होते. गटविकास अधिकारी कार्यालयातील विस्तार अधिकारी प्रतापराव राणे हे निर्वाचन अधिकारी म्हणून उपस्थित होते. निवडणूक प्रक्रिया हाताळण्यासाठी पंचायत सचिव सुजाता मोरजकर यांनी सहकार्य केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com