'कांतारा' फेम ऋषभ शेट्टीची गोव्यात एन्ट्री! CM सावंतांनी केले कौतुक म्हणाले,'संस्कृतीचा सन्मान करणारे आणखी चित्रपट बनवा'

Rishab Shetty in Goa: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ऋषभ शेट्टी यांच्याशी झालेल्या संवादाचे वर्णन 'उत्कृष्ट आणि बहुगुणी नट' असे केले.
Kantara fame actor
Kantara fame actorDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: कन्नड चित्रपटसृष्टीतील 'कांतारा' या सुपर-डुपर हिट चित्रपटाचे दिग्दर्शक, लेखक तथा मुख्य अभिनेता ऋषभ शेट्टी आणि त्यांच्या पत्नी प्रगती शेट्टी यांनी आज (बुधवार, २६ नोव्हेंबर) गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची आल्तिनो,पणजीतील येथील महालक्ष्मी येथे भेट घेतली.

'कांतारा'च्या भव्य यशाबद्दल अभिनंदन

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ऋषभ शेट्टी यांच्याशी झालेल्या संवादाचे वर्णन 'उत्कृष्ट आणि बहुगुणी नट' असे केले. मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी ऋषभ शेट्टी यांचे 'कांतारा' चित्रपटाला मिळालेल्या भव्य यशामुळे मनःपूर्वक अभिनंदन केले.

तसेच, "भविष्यात त्यांना आणखी अनेक शानदार, संस्कृतीचा सन्मान करणारे आणि जगभर गाजणारे टप्पे पार करण्याची संधी मिळो आणि यासाठी मी शुभेच्छा देतो," असेही त्यांनी म्हटले.

कांतारा': संस्कृती आणि यशाची कहाणी

'कांतारा' हा चित्रपट २०२२ साली प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट कर्नाटकच्या किनारपट्टीवरील 'दैव कोला' या पारंपरिक भूता कोला (Bhuta Kola) या धार्मिक नृत्य आणि लोककथेवर आधारित आहे. या चित्रपटाने केवळ कन्नड चित्रपटसृष्टीतच नव्हे, तर संपूर्ण भारत आणि जगभरात मोठी प्रशंसा मिळवली.

Kantara fame actor
Kantara: कांतारा प्रेक्षकांना का आवडला? अभिनेता, निर्माता ऋषभ शेट्टीने सांगितले कारण...

मूळतः कन्नड भाषेत बनलेला हा चित्रपट नंतर हिंदीसह अनेक भारतीय भाषांमध्ये प्रदर्शित झाला आणि त्याने सांस्कृतिक अस्मिता आणि उत्कृष्ट कथाकथन याच्या बळावर बॉक्स ऑफिसवर भरघोस कमाई केली. यानंतर २०२५ मध्ये आलेल्या कांतारा-चॅप्टर १ ने देखील भरगोस कमाई केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com