Kankavli: आचारसंहिता भंगप्रकरणी नीतेश राणेंवर गुन्हा दाखल करा

Kankavli: नांदगावच्या सभेनंतर शिवसेनेने मागणी केली आहे.
Nitesh Rane
Nitesh RaneDainik Gomantak
Published on
Updated on

Kankavli: ‘‘आम्हाला मतदान केले नाही तर सरकारचा एकही रुपयाचा निधी नांदगाव गावासाठी दिला जाणार नाही, असा इशारा देणाऱ्या आमदार नीतेश राणे यांच्यावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करावा,’’

अशी मागणी नांदगाव शिवसेना शाखाप्रमुख राजा म्‍हसकर यांनी कणकवली पोलिस निरीक्षक आणि निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. गुन्हा दाखल न झाल्‍यास आंदोलन छेडण्याचा इशाराही त्‍यांनी दिला.

म्‍हसकर यांनी कणकवली पोलिस निरीक्षक आणि निवडणूक निर्णय अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘‘नांदगाव ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप पुरस्कृत पॅनेलचे सरपंच पदाचे उमेदवार रविराज मोरजकर यांचा प्रचार करण्यासाठी आमदार नीतेश राणे 11 डिसेंबरला नांदगाव येथे आले होते.

दुपारी तीनला नांदगाव तिठा येथे प्रचार सभेत त्यांनी, ‘मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री, जिल्हाधिकारी, माझ्या अधिकाराखाली आहेत. आम्हाला मतदान केले नाही तर सरकारचा एकही रुपयाचा निधी नांदगाव गावासाठी दिला जाणार नाही,’ असे म्हटले.

Nitesh Rane
Maharashtra-Karnataka Border Dispute: महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादात अमित शहांची मध्यस्थी..

त्याची व्हिडिओ क्लिपही व्हायरल झाली आहे. त्यांनी आचारसंहितेचा भंग केला आहे. राणे यांच्या या वक्तव्याची व्हिडीओ क्लिप आपणास सादर करत आहोत. त्यांच्यावर गुन्हा दाखल करा, अन्यथा आंदोलन छेडू.’’ असे शिवसेना शाखाप्रमुख राजा म्‍हसकर म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com