Kanguva Teaser: 'कंगुवा'चा टीझर घालतोय धुमाकूळ; गोव्यासह ‘या’ खास ठिकाणी झालं बीग बजेट चित्रपटाचं शूटिंग

Kanguva Teaser: स्टुडिओ ग्रीन आणि सूर्या शिवकुमार यांच्या मॅग्नम ऑपस 'कंगुवा'चा टीझर रिलीज झाला आहे. देशभरात या चित्रपटाचा टीझर धूमाकूळ घालत आहे.
Kanguva
KanguvaDainik Gomantak

Kanguva Teaser: स्टुडिओ ग्रीन आणि सूर्या शिवकुमार यांच्या मॅग्नम ऑपस 'कंगुवा'चा टीझर रिलीज झाला आहे. देशभरात या चित्रपटाचा टीझर धुमाकूळ घालत आहे. विशेष म्हणजे, या शानदार टीझरमध्ये सर्व काही आहे, ज्यामध्ये एक्सपर्टाइज, क्रिएटिव थिंकिंग, कंटेंटची ओरिजेनिलिटी, जबरदस्त बॅकग्राउंड स्कोर आणि अंएक्जिक्यूशन इत्यादी... 'कंगुवा'च्या टीझरची देशभरात चर्चा होत आहे. प्रत्येकाला हा टीझर आवडला असून प्रेक्षक धमाकेदार ॲक्शन पाहण्यासाठी आतुर आहेत. यात बॉबी देओल खलनायकाच्या भूमिकेत आहे. तर सूर्या एका शूर योद्ध्याच्या भूमिकेत आहे, ज्यांच्यामध्ये जबरदस्त लढाई पाहायला मिळणार आहे. याशिवाय, चित्रपटाचे शूटिंग मेकर्संनी अनेक रियल लोकेशन्सवर केले आहे.

दरम्यान, कंगुवा हा निःसंशयपणे यावर्षी येणाऱ्या सर्वात मोठ्या चित्रपटांपैकी एक असणार आहे. प्रेक्षकांसाठी हा एक अविस्मरणीय अनुभव देण्याचा मेकर्संनी प्रयत्न केला आहे. हा चित्रपट भूतकाळ आणि वर्तमान अशा दोन वेगवेगळ्या काळातील कहाणी सांगतो. म्हणूनच मेकर्संनी जगभरातील खऱ्याखुऱ्या लोकेशन्सवर त्याचे चित्रीकरण केले आहे. चित्रपटाला खास बनवण्यासाठी मेकर्संनी गोवा, युरोप आणि श्रीलंका यांसारख्या सुंदर ठिकाणी त्याचे शूटिंग केले आहे. त्यांनी तिथे तब्बल 60 दिवस शूटिंग केले, खासकरुन ॲक्शन सीनसाठी. 350 कोटींचे बजेट असलेल्या या चित्रपटाच्या काही महत्त्वाच्या भागाचे शूटिंग चेन्नई आणि पाँडिचेरीमध्ये करण्यात आले आहे.

Kanguva
High Tide Alert For Panaji: पणजीसाठी 22 दिवस धोक्याचे; पावसाळ्यात उसळणार 4.5 मीटरपेक्षा अधिक उंच लाटा

अलीकडेच, मेकर्संनी केरळ आणि कोडाईकनॉलच्या जंगलात सूर्यासोबत एक महत्त्वाचा सीन शूट केला. गेल्या ऑक्टोबरमध्ये, मेकर्संनी संपूर्ण टीमसह बँकॉकमध्ये तीन आठवड्यांच्या शेड्यूलमध्ये शूट केले. मेकर्संनी ॲक्शन सीन्सना शानदार बनवण्यासाठी खास कॅमेरे, Alexa Super 35 आणि Alexa LF वापरले आहेत. हा चित्रपट दोन वेगवेगळ्या युगांची कहाणी सांगतो, भूतकाळ आणि वर्तमान काळ, ज्यामध्ये 1000 वर्षांची कहाणी आहे. दोन्ही काळ प्रेक्षकांसमोर सुंदरपणे मांडता यावेत याची काळजी मेकर्संनी घेतली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com