MLA Kedar Naik On Tinted Glasses Cars: पर्वरी येथील कामाक्षी खून प्रकरणात संशयिताने मृतदेह आंबोलीत नेण्यासाठी काळ्या काचा (Accused use Tinted Glasses Car) असलेल्या कारचा वापर केला होता. काळ्या काचा असलेल्या कारचा वापर करीत त्याने गोवा हद्द पार करीत महाराष्ट्रात प्रवेश केला होता.
पर्वरी ते गोव्याची हद्द पत्रादेवी येथील महामार्गावर तसेच पत्रादेवी चेक पोस्टवर पोलिसांची गस्त असते. वाहतूक पोलिस तसेच चेक पोस्ट वरील पोलिसांच्या नजरेतून ही कार कशी चुकली असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. तसेच पोलिसांच्या कारभारावर संशय व्यक्त केला जात आहे.
दरम्यान यावर साळगावचे आमदार केदार नाईक यांंनी प्रतिक्रिया दिली आहे. प्रत्येक चेकपोस्टवर काळ्या काचा असलेली वाहने तापासली पाहिजेत अशी मागणी त्यांनी केली. तसेच दोन्ही चेकपोस्टवर त्रुटी असल्याचाही आरोप आमदार केदार यांनी केला.
आमदार केदार नाईक म्हणाले, "व्हीआयपी असोत किंवा इतर सामान्य व्यक्ती. प्रत्येक चेकपोस्टवर काळ्या काचा असलेली वाहने तापासली पाहिजेत. वाहनाला काळ्या काचा लावल्याचे आढळल्यास दंड ठोठावण्यात यावा. गोवा राज्याच्या हद्दीवरील दोन्ही चेकपोस्टमध्ये त्रुटी आहेत" असे नाईक म्हणाले.
रविवारी पोलिसांनी आणि फॉरेन्सिक टीमने पर्वरीतील घटनास्थळी संशयिताला नेत पंचनामा केला. महत्त्वपूर्ण पुरावे गोळा करण्यासाठी तपास पथकांनी गुन्ह्याच्या ठिकाणी बारकाईने शोध घेतला.
कामाक्षी उड्डापनोवा हिच्या शरिरावर तब्बल चाकूचे 20 वार असल्याचे शवविच्छेदनाचा अहवालातून स्पष्ट झाले आहे. या चाकूच्या वारांमुळेच कामाक्षीचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. तसेच संशयितांनी तिचा मृतदेह आंबोली घाटात 50 फूट खोल दरीत फेकून दिला होता.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.