Kavyashree Kurse: '..बादल पे पाँव है'! काले येथील काव्यश्री कुर्सेने घेतली आकाशझेप; 21व्या वर्षी बनली व्यावसायिक पायलट

Goa Girl Youngest Pilot: बालपणापासूनच विमान उडवण्याचे स्वप्न मनात ठेवलेल्या काव्यश्रीने गोव्यात प्राथमिक ते उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केले.
Kavyashree kurse pilot, kalem village goa pilot, goa youngest commercial pilot
Kavyashree kurse pilot, kalem village goa pilot, goa youngest commercial pilotDainik Gomantak
Published on
Updated on

फोंडा: कधी काळी आकाशाकडे पाहत स्वप्ने रंगवणारी डुक्करकोंड (काले) गावातील काव्यश्री कुर्से आज प्रत्यक्ष त्या आकाशात उड्डाण घेत आहे. अवघ्या २१ व्या वर्षी व्यावसायिक पायलट बनत तिने केवळ स्वतःचे नव्हे, तर संपूर्ण गोव्याचे नाव उंचावले आहे.

ग्रामीण पार्श्वभूमीवरून मोठे ध्येय गाठणाऱ्या काव्यश्रीच्या यशाचे सांगेसह संपूर्ण राज्यातून कौतुक होत आहे. बालपणापासूनच विमान उडवण्याचे स्वप्न मनात ठेवलेल्या काव्यश्रीने गोव्यात प्राथमिक ते उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केले.

Kavyashree kurse pilot, kalem village goa pilot, goa youngest commercial pilot
Positive Story: वहां तूफान भी हार जाते हैं! 40 मीटर खोल खडक खोदून त्यानं पाणी शोधलं अन् गावाची तहान भागवली; गोव्यातील जिद्दी 'अय्या'ची कहाणी

त्यानंतर बारामती (महाराष्ट्र) येथील विमान अकादमीत तब्बल २०० तासांचे प्रशिक्षण घेत तिने ‘कमर्शियल पायलट लायसन्स’ प्राप्त केले. तिची जिद्द, शिस्त आणि ध्येयवेडेपणा आज अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरला आहे.

Kavyashree kurse pilot, kalem village goa pilot, goa youngest commercial pilot
Positive News: बधाई हो लडकी हुई! मोले येथे इमर्जन्सी प्रेग्नेंसी केसला आरोग्य खात्याचा जलद प्रतिसाद; आई बाळ सुरक्षित

स्वप्न साकार करण्यासाठी घेतले कर्ज...

“काव्यश्री पायलट व्हावी, ही आमची इच्छा होती. आर्थिक अडचणी असूनही तिच्या शिक्षणासाठी आम्ही कर्ज घेतले. पण तिने आमच्या प्रत्येक रुपयाचे चीज केले. आज आमचे मन अभिमानाने भरून आले आहे, असे काव्यश्रीचे वडील लक्ष्मीनारायण कुर्से यांनी भावनावश होऊन सांगितले. आईनेही डोळ्यात आनंदाश्रू आणत म्हटले, “मुलीचे स्वप्न पूर्ण होताना पाहणे, हा आई-वडिलांसाठी सर्वात मोठा क्षण असतो.”

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com