Kalarang 2024: गोव्यात पाच दिवस रंगणार ‘कलारंग महोत्सव’! 'या' सुप्रसिद्ध अभिनेत्रीच्या हस्ते होणार उदघाट्न

Kalarang Festival 2024: कलांगण संस्था, रवींद्र भवन मडगाव व कला संस्कृती संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेला संगीत, नृत्य, नाट्यावर आधारित ‘कलारंग २०२४ महोत्सव’ गुरुवार, १७ ते सोमवार, २१ रोजीपर्यंत असे पाच दिवस मडगावच्या रवींद्र भवनात आयोजित करण्यात आला आहे.
Goa Kalarang Festival 2024
Goa Kalarang Festival 2024Dainik Gomantak
Published on
Updated on

Goa Kalarang Festival 2024

सासष्टी: कलांगण संस्था, रवींद्र भवन मडगाव व कला संस्कृती संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेला संगीत, नृत्य, नाट्यावर आधारित ‘कलारंग २०२४ महोत्सव’ गुरुवार, १७ ते सोमवार, २१ रोजीपर्यंत असे पाच दिवस मडगावच्या रवींद्र भवनात आयोजित करण्यात आला आहे.

यंदा या महोत्सवाची संकल्पना ‘नारी शक्ती’ असून जास्तीत जास्त कार्यक्रम महिलांनी सादर केलेले असल्याची माहिती कलांगणाचे अध्यक्ष वकील राजीव शिंक्रे यांनी रवींद्र भवनचे अध्यक्ष राजेंद्र तालक व सदस्य सचिव आग्नेल फर्नांडिस यांच्या उपस्थितीत दिली.

महोत्सवाचे उद्‌घाटन सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री अलका कुबल आठल्ये यांच्या हस्ते केले जाणार आहे. याचवेळी कलाक्षेत्रात अतुलनीय योगदान देणाऱ्या वर्षा उसगावकर, हेमा सरदेसाई व वालुस्चा डिसोझा यांचा सत्कार केला जाणार आहे. गेली २५ वर्षे संस्थेशी संलग्न असलेल्या व शास्त्रीय नृत्यामध्ये आपले बहुमोल योगदान देणाऱ्या डॉ. सुचिता भिडे चाफेकर यांचा खास गौरव करण्यात येणार आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

Goa Kalarang Festival 2024
Goa Recruitment: सुवर्णसंधी! लवकरच तीन हजार पदांची भरती; आयोगाच्या हालचालींना वेग

कलाप्रेमींकडून लाभतो उत्स्फूर्त प्रतिसाद

गेली २२ वर्षे ‘कलांगण’ हा महोत्सव आयोजित करीत असून त्याला गोव्यातील सर्व कलाप्रेमींकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे, असे शिंक्रे यांनी सांगितले.

उद्‌घाटन सोहळ्यास कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे अध्यक्षस्थान भूषविणार असून सन्माननीय अतिथी म्हणून मडगावचे आमदार दिगंबर कामत उपस्थित राहतील.

१९९६ साली केवळ ४० विद्यार्थ्यांना घेऊन सुरू केलेल्या कलांगण संस्थेत सध्या ३०० पेक्षा जास्त विद्यार्थी संगीत, वादन, नृत्य, चित्रकला अशा विविध क्षेत्रांमध्ये प्रशिक्षण घेत आहेत

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com