Sattari Goa: सत्तरीचे प्रसिद्ध कीर्तनकार गायनाचार्य 'रामचंद्र'

Sattari: सत्तरी तालुक्यात कला क्षेत्र हे नेहमीच अधिस्थानी राहिले आहे.
Sattari | Singer Ramchandra Naik
Sattari | Singer Ramchandra NaikDainik Gomantak
Published on
Updated on

Sattari: सत्तरी तालुक्यात कला क्षेत्र हे नेहमीच अधिस्थानी राहिले आहे. असेच एक व्यक्तिमत्त्व ज्यांनी आपल्या 34 वर्षांच्या गायन व शिक्षकी पेशात गुणी स्वभावातून सत्तरी तालुक्यात वेगळी छाप पाडली. ते म्हणजे रामचंद्र नाईक. रामचंद्र हे शिरगाव येथील असून यांना वडील कै. धोंडू नाईक यांचे लहानपणी विशेष मार्गदर्शन मिळाले. नंतर कै. श्रीपादबुवा माडये यांच्या मार्गदर्शनाखाली अ.भा. गांधर्व महाविद्यालय मंडळाची संगीत विशारद पदविका संपादन केली होती. तसेच तबला, हार्मोनियम विषयाच्या पदविका संपादन केल्या होत्या.

विकबुवा जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली गोवा, महाराष्ट्र, कर्नाटकात दोनशेहून अधिक कीर्तने सादर केली आहेत. त्यांना हार्मोनियमची साथ नाना शिरगावकर, वामनराव पिळगावकर, मोहनदास पोळे, पांडुरंग राऊळ, हेमंत पेंडसे, शेखर कुंभोजकर आदींनी केली आहे.

82 गावांमध्ये वर्ग

34 वर्षांच्या काळात अडीच हजारांहून अधिक शिष्यांना गायनाचे धडे दिले आहेत. रामचंद्र यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी, शिष्यांनी प्रगती करीत बालभवन गोवा, स.शा.वि. सरकार मान्य संस्थांमध्ये संगीत शिक्षकांचे कार्य करीत आहेत. गोव्यात 82 गावांमध्ये भजनाचे वर्ग घेतले आहेत.

संगीत प्रशिक्षणाचे कार्य

भजन परंपरा कायम राहावी म्हणून नाईक यांनी भजनी पथके कला अकादमीच्या भजन स्पर्धेत सहभागी करून घेतली आहेत. सरकारी मान्यताप्राप्त संस्थांमध्ये संगीताचे प्रशिक्षण देण्याचे कार्य केले आहे. सध्या शंभर विद्यार्थी त्यांच्याकडे शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेत आहेत.

नाटकातील योगदान...

सं. सौभद्र, विद्याहरण, मत्स्यगंधा, संशयकल्लोळ, गुरुदक्षिणा, ययाती देवयानी, अमृत मोहिनी आदी नाटकांत भूमिका साकारल्या आहेत. 1998 साली हरवळे येथे राधाकृष्ण संगीत अकादमीची स्थापना करून आजतागायत संस्थापक, संगीत शिक्षक म्हणून जबाबदारी पेलली आहे.

अनेक पुरस्कार

कला अकादमी गोवा, स्वरबहार संगीत संस्था डिचोली, सातेरी संस्था कुडचिरे, स्वर संगम केरी, सार्वजनिक वाळपई गणेश मंडळ, म्हादई कलामंच होंडा आदी ठिकाणी सन्मान, सत्कार, कला विश्व रत्न पुरस्कारही त्यांना मिळाले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa Sattari Pre-Monsoon Works
Goa Weather Forecast IMD
Hema Sardesai condemns Gautam Khattar
Sattari River Drowning Cases
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com