Kala Academy : कला अकादमीचा वाद चर्चेतून सामंजस्‍याने सुटणे खूप गरजेचे; ‘गोवा कलाकार एकवोट’कडून मंत्र्यांची पाठराखण

Goa Artist Demand : या प्रकरणात अन्य संबंधितांचा राजीनामा मागण्याचे धाडस कुणीच दाखवत नाही. मंत्री गावडे यांना टार्गेट करण्यात येत असून हा शिमगा ताबडतोब बंद करावा, असे नरेश कडकडे म्‍हणाले.
Kala Academy: कला अकादमीची साऊंड सिस्टम कालबाह्य आणि सुमार दर्जाची! 'साऊंड मॅन ऑफ इंडिया'ची खंत
Kala Academy in Panjim Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी, कला अकादमी दुरूस्तीकामास झालेला विरोध आणि होणारे भष्ट्राचाराचे आरोप यासाठी केवळ कला आणि संस्कृतीमंत्री गोविंद गावडे यांनाच दोषी ठरविणे चुकीचे आहे.

या प्रकारात अन्य राजकीय नेते, विविध खात्यांच्या अधिकाऱ्यांचाही समावेश आहे, असा सूर ‘गोवा कलाकार एकवोट’ या संघटनेतर्फे आयोजित सभेत व्यक्त करण्यात आला.

येथील इन्‍स्‍टिट्यूट मिनेझिस ब्रागांझा संस्‍थेच्‍या सभागृहात काल शुक्रवारी झालेल्‍या सभेला शास्त्रीय गायक प्रवीण गावकर, नाट्यकर्मी रवींद्र आमोणकर, माजी मंत्री विनोद पालयेकर, प्रख्यात गायक शौनक अभिषेकी, तियात्रिस्‍त मिनीन द बांदार, नाट्यकलाकार नरेश कडकडे, नम्रता नाईक, देविदास गावकर व इतर कलाकार उपस्थित होते.

देविदास गावकर म्हणाले, कला-संस्कृतीमंत्री गोविंद गावडे यांच्यावर होणारी टीका आणि थेट राजीनामा मागण्याचा प्रकार पाहता यामागे मोठे षड्‌यंत्र असल्याचे दिसून येते. कला आणि संस्कृती क्षेत्राशी काहीही देणे-घेणे नसलेले लोकही त्यांच्याविरोधात बोलू लागतात तेव्हा त्यांचा बोलविता धनी वेगळाच असल्याचे दिसते.

दुरुस्‍तीही फार काळ टिकणार नाही

कला अकादमीची वास्तू पूर्णतः पाडून त्याजागी नवा प्रकल्प उभारण्याची योजना होती. परंतु चार्‍ल्‍स कुरैया फाऊंडेशननेच विरोध केल्यामुळे तिच्या दुरुस्तीचा निर्णय घेण्यात आला. खरे तर या वास्तूच्या वयाचा विचार करता सध्याची दुरुस्तीही फार काळ टिकणारी नाही. अशी सूचना गावकर यांनी केली.

Kala Academy: कला अकादमीची साऊंड सिस्टम कालबाह्य आणि सुमार दर्जाची! 'साऊंड मॅन ऑफ इंडिया'ची खंत
kajol B'Day: अजय देवगणने काजोलच्या वाढदिवसानिमित्त शेअर केला खास व्हिडिओ

यापूर्वी दुरुस्‍तीचा विचार झालाच नव्‍हता

कला अकादमीच्या सुरूवातीपासून आजतागायत अनेक नेते, अधिकारी आले व गेले. परंतु कुणीही तिच्या दुरुस्तीबाबत विचार केला नाही. मंत्री गावडे हे स्वतः एक कलाकार असल्याने त्‍यांनी दुरुस्तीकाम हाती घेतले.

सध्या ते पूर्णत्वासही आले आहे. खरा कलाकार कधीच दुसऱ्या कलाकाराची बदनामी करत नसतो. या प्रकरणात अन्य संबंधितांचा राजीनामा मागण्याचे धाडस कुणीच दाखवत नाही. मंत्री गावडे यांना टार्गेट करण्यात येत असून हा शिमगा ताबडतोब बंद करावा, असे नरेश कडकडे म्‍हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com