कदंब महामंडळ कात टाकणार; गोवेकरांच्या सेवेत नवीन बस दाखल होणार

10 ते 15 वर्ष जुन्या झालेल्या बस टप्प्याटप्प्याने बंद करण्याचा महामंडळाचा प्रस्ताव
Kadamba Transport Corporation
Kadamba Transport CorporationDainik Gomantak

पणजी : एकीकडे गोव्यात सध्या कदंब महामंडळामधील अनागोंदी कारभार समोर येत असतानाच आता गोमंतकीय प्रवाशांसाठी एक सुखद बातमी आहे. गोव्यातील कदंब महामंडळ आता कात टाकणार आहे. कदंबच्या ताफ्यात असलेल्या जुन्या बस आता बदलल्या जाणार असून त्यांच्याजाही नव्या इलेक्ट्रिक गाड्यांची खरेदी केली जाणार आहे. 10 ते 15 वर्ष जुन्या झालेल्या गाड्या टप्प्याटप्प्याने भंगारात काढल्या जाणार असल्याची माहिती आहे. उल्हास तुयेकरांनी महामंडळाची धुरा सांभाळल्यानंतर मरगळलेल्या कदंबच्या कारभाराला गती मिळाल्याचं चित्र आहे.

Kadamba Transport Corporation
वादग्रस्त सिल्व्हर सँड हॉटेलवरील कारवाई नेमकी का रखडली?

सध्या गोव्यात कदंबच्या ताफ्यामध्ये सुमारे 120 गाड्या जुन्या आहेत, ज्या बदलण्याची आवश्यकता आहे. या बस हळूहळू भंगारात काढून त्याजागी पर्यावरणपूरक अशा इलेक्ट्रिक बसगाड्या खरेदी करण्यासाठी प्रस्ताव दिल्याची माहिती आहे. गेल्या काही दिवसात कदंबच्या गाड्यांची देखभाल दुरुस्तीसह जुन्या गाड्यांचा विषय ऐरणीवर आला आहे. सावईवेरे परिसरात बस डिझेलअभावी बंद पडल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा याच भागात बस बंद पडली होती. या दोन्ही घटनांमुळे सर्वसामान्य प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला होता.

यानंतर कर्नाटकमधून पणजीला येणाऱ्या कदंब बसची चाकं म्हापशाजवळील धुळेर येथे निखळली होती. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नव्हती. या सर्व घटनांच्या चौकशीचे आदेश देण्यात आले असून डिझेल न भरताच बस नेणाऱ्या चालकाला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. सध्या महामंडळाच्या ताफ्यामध्ये अंदाजे 350 च्या आसपास गाड्या असून यातील 250 गाड्याच विविध मार्गावर धावतात. उर्वरित 100 गाड्याबाबत लवकरच निर्णय घेतला जाणार आहेत.

Kadamba Transport Corporation
गोव्यात सरकारी नोकरीची संधी; पोस्टात 39 पदांसाठी अर्ज मागवले

उल्हास तुयेकरांनी कदंब प्रशासनावर वचक तयार करण्यास सुरुवात केली आहे. महामंडळाच्या ताफ्यातील सर्व 120 गाड्या डिसेंबर अखेरपर्यंत बदलल्या जाणार असून त्याच्याजागी नव्या इलेक्ट्रिक गाड्या खरेदी केल्या जाणार आहेत. सध्या कदंब महामंडळाकडे 50 इलेक्ट्रिक गाड्या असून येत्या सहा महिन्यात आणखी 100 बस ताफ्यात दाखल होणार आहेत. यासोबतच पुढील 5 वर्षांच्या काळात तब्बल 1200 इलेक्ट्रिक बस खरेदीचा प्रस्ताव सरकारकडे देण्यात आला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com