कदंबच्या ताफ्यात आणखी 15 इलेक्ट्रिक बसेसचा समावेश
KTC Electric Buses : गोवा हे समृद्धतेने आणि निसर्गाने नटलेले एक छोटेसे राज्य आहे. दरवर्षी इथे लाखो पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते. अनेकांचे आवडते राज्य जरी असले तरी इथल्या महत्त्वाच्या समस्यांपैकी एक समस्या म्हणजे दळणवळणाची. गोव्यामध्ये एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी प्रामुख्याने टॅक्सीचा अवलंब करावा लागतो, जो सर्वसामान्यांना परवडण्या सारखा नसतो. त्यामुळे आता गोवा सरकारने कदंब इलेक्ट्रिक बसेस वाढवण्यावर प्रामुख्याने भर दिला आहे. (Kadamba Corporation includes 15 more electric buses)
याआधी कदंबच्या 35 इलेक्ट्रिक बसेस गोवेकरांच्या सेवेत तैनात झाल्या आहेत. त्याचबरोबर आता आणखी 15 बसेसची यामध्ये भर पडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या 15 बसेसचे परमिट आणि इतर अधिकृत गोष्टी पूर्ण झाल्यानंतर या बसेस गोव्यामध्ये लवकरच सुरू होणार आहेत.
कार्बनमुक्त गोवा या उपक्रमा अंतर्गत या बसेस जास्तीत जास्त वाढवण्याचे सरकारचे ध्येय आहे. अशा प्रकारे आता गोव्यात एकूण 50 कदंब इलेक्ट्रिक बसेस झाल्या आहेत. आणि यापुढेही गोवा सरकार इलेक्ट्रिक बसेस वाढवण्यावर भर देणार आहेत यासाठी चार्जिंग पॉईंट्स ची सुद्धा सुविधा उपलब्ध आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.