जेश उसपकर आणि मंगेश नाईक कदंब बस कर्मचारी
जेश उसपकर आणि मंगेश नाईक कदंब बस कर्मचारीDainik Gomantak

कदंब बस कर्मचाऱ्यांनी दाखवला प्रामाणिकपणा

कदंब बसच्या चालक आणि वाहकांचे महामंडळाने कौतुक केले
Published on

पणजी : गोव्यामध्ये (Goa) कदंब बससेवा (Kadamba Bus Service) उत्तम प्रवाससेवेसाठी ओळखला जाते. आणि हे पुन्हा सिद्ध झाले आहे. कदंब बसमध्ये एक महिला आपली पर्स विसरली होती. या पर्समध्ये सोन्याचे दागिने होते. ही पर्स बसमधील संबंधित प्रवाशाला परत करून कदंब महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणाचा आदर्श संपूर्ण गोवेकरांपुढे ठेवला आहे.

गणेशोत्सवाच्या काळात शिरदोणा येथील संबधीत सुनीता शिरोडकर यांनी पणजी ते मडगाव या मार्गावरून कदंब बसमधून प्रवास केला. ती महिला मडगावात उतरली. नंतर बसमध्येच पर्स विसरल्याचे महिलेच्या लक्षात आले. त्यांनी ही बस शोधण्याचा प्रयत्न केला; परंतु ही बस मडगावहून पणजीसाठी रवाना झाली होती.

जेश उसपकर आणि मंगेश नाईक कदंब बस कर्मचारी
Goa Police Recruitment 2021: 22 सप्टेंबरपासून सुरू होणार 296 जागांसाठी पदभरती

आपली दागिने असलेली पर्स विसरल्याने महिला अस्वस्थ झाली. कारण त्या पर्समध्ये सोन्याच्या दागिन्यांसह काही रोख रक्कमही होती. दरम्यान ही पर्स एका प्रवाशाला दिसताच त्याने ती पर्स वाहक मंगेश नाईक यांच्या ताब्यात दिली. कदंब बसचे चालक राजेश उसपकर आणि वाहक मंगेश नाईक यांनी त्या महिलेची ओळख पटवून ती पर्स तिच्या स्वाधीन केली. कदंब बसच्या चालक आणि वाहकांनी दाखवलेल्या प्रामाणिकपणाबद्दल कदंबा महामंडळाने त्यांचे कौतुक केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com