'आधीच्या सरकारांनी मेवा खाल्ला तर, मोदीजी अन् अटलजींनी सेवा केली': जेपी नड्डा

2014 पूर्वी फक्त व्होट बँकेचे राजकारण (Politics) अस्तित्वात होते जिथे मत मिळवण्यासाठी समाजातील एकाच वर्गाचा जास्त विचार केला जात असे.
jp nadda

jp nadda

Dainik Gomantak 

Published on
Updated on

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा (jp nadda) यांनी बुधवारी गोव्यातील पणजी येथे संकल्प रथयात्रेला हिरवा झेंडा दाखवला. गोव्यातील भाजप सरकारच्या 10 वर्षांच्या रिपोर्ट कार्ड लॉन्च कार्यक्रमात जेपी नड्डा देखील सहभागी झाले होते. यावेळी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंतही (Chief Minister Dr. Pramod Sawant) उपस्थित होते. कार्यक्रमात नड्डा म्हणाले की, लोकशाहीमध्ये कार्यसंस्कृती बदलत आहे, ती पंतप्रधान मोदींमुळे आली आहे. 2014 पूर्वी फक्त व्होट बँकेचे राजकारण अस्तित्वात होते जिथे मत मिळवण्यासाठी समाजातील एकाच वर्गाचा जास्त विचार केला जात असे.

यापूर्वीच्या सरकारांनी केवळ आपल्या कुटुंबाच्या विकासासाठी कामे करत भ्रष्टाचारास खतपाणी घातले असल्याचे देखील यावेळी ते म्हणाले. 2014 नंतर लोकांच्या विकासाची चर्चा झाली, आधीच्या सरकारांनी मेवा खाण्याचे काम केले तर मोदीजी आणि अटलजींनी 'सेवा' केली.

<div class="paragraphs"><p>jp nadda</p></div>
'जेपी नड्डा गोव्यातील जनतेला मूर्ख बनवत आहेत'; मोईत्रा यांचा हल्लाबोल

रिपोर्ट कार्ड लॉन्चिंग कार्यक्रमात बोलताना नड्डा म्हणाले की, तुमच्या सर्वांच्या सहकार्याने आम्ही पुढे जाऊ. येथील विकासामध्ये आम्ही लोकांच्या विचारांचा समावेश करु. गोव्याच्या विकासाचे स्वप्न तुमचे, तेच आमचे. हे पुढे नेण्यासाठी आम्ही आमचा वाटा उचलू.

गोव्याच्या विकासात भाजप सरकारने आघाडी घेतली

ते पुढे म्हणाले की, ''आधी मनोहर पर्रीकर (manohar parrikar) यांच्या नेतृत्वाखाली आणि आता प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली भाजप सरकारने गोव्याच्या विकासात मोठी आघाडी घेतली आहे. आता आम्ही लोकांच्या सूचनांवर कार्यवाही करत आहोत. त्यामुळे आम्ही सर्व विधानसभांमध्ये काय केले, हे सांगण्यासोबतच आता लोकांना पुढे काय हवे आहे, या गोष्टीचा देखील आम्ही धांडोळा घेऊ.''

2014 नंतर जनतेच्या हिताची खरी काळजी

नड्डा म्हणाले की, 2014 पूर्वीची संस्कृती अशी होती की लोकप्रिय चर्चा करा, व्होट बँकेचे राजकारण करा, विशिष्ट वर्गाचे राजकारण करा, मग मते घेऊन कुटुंबाचे भले करा आणि घर भरा. मात्र पीएम मोदी आल्यानंतर जनतेच्या हिताची चर्चा करत जनतेच्या हिताची चिंता करु लागले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com