Margao News : आंदोलक गटामध्ये आनंद; सामान्यांमध्ये अनभिज्ञता

Margao News : कॅ. विरियातो फर्नांडिस यांच्या उमेदवारीवर नेत्यांच्या प्रतिक्रिया
Margao
Margao Dainik Gomantak

Margao News :

मडगाव, कॅ. विरियातो फर्नांडिस यांना काँग्रेस पक्षाने उमेदवारी जाहीर केल्यानंतर दक्षिण गोव्यातून संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त होत असून आंदोलकांच्या गोटातून आनंदाचे वातावरण पसरले असून सामान्य मतदारांतून मात्र हे कॅप्टन कोण, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली जात होती.

दक्षिण गोव्यातील उमेदवारी ख्रिस्ती उमेदवारालाच देण्यात यावी, अशी मागणी एका गटाकडून केली जात होती. यात सामाजिक संस्थांच्या नेत्यांचाही सामावेश होता.

कॅ. फर्नांडिस यांनी पूर्वी नौदलात काम केले असून नौदलातून निवृत्त होऊन ते गोव्यात आल्यावर त्यांनी गोव्यातील पर्यावरणीय चळवळीत स्वतःला झोकून दिले. कोळसाविरोधी आंदोलनात त्यांनी आघाडीवर राहून काम केले. त्यामुळे ते अचानक प्रकाशझोतात आले.

कॅ. फर्नांडिस हे एक चांगले आणि तडफदार व्यक्तिमत्त्व असून त्यांना काँग्रेसची उमेदवारी मिळणे ही चांगली बाब आहे. सगळ्या ‘एनजीओं’चा त्यांना पाठिंबा असेल, असे मत पर्यावरण चळवळीतील कार्यकर्ते अभिजीत प्रभुदेसाई यांनी व्यक्त केले.

ही उमेदवारी कॅ. फर्नांडिस यांनाच मिळावी यासाठी आघाडी घेतलेले ॲड. राधाराव ग्रासियस यांची प्रतिक्रिया विचारली असता, ‘काँग्रेस देर आये लेकीन दुरुस्त आये’, असे म्हणावे लागेल. काँग्रेसने उमेदवारी जाहीर करण्यास एवढा उशीर का केला, हे कळायला मार्ग नाही, असे त्यांनी सांगितले.

काँग्रेस पक्षाने दक्षिण गोव्यातून मला लोकसभेची उमेदवारी दिली, त्यामुळे मी सर्व काँग्रेस नेत्यांचा आभारी आहे. मात्र, ही उमेदवारी फक्त मला मिळालेली नाही, तर भाजपच्या अत्याचारामुळे जी जनता राज्यात पिचली गेली आहे त्या सर्वांना दिलेली ही उमेदवारी आहे,

- कॅ. विरियातो फर्नांडिस, काँग्रेसचे दक्षिण गोवा उमेदवार

काँग्रेस पक्षाने लोकसभेसाठी जे दोन उमेदवार दिले आहेत, ते खरोखरच चांगले असून त्या दोघांनाही मी शुभेच्छा देतो. गोव्यातील जनता भाजपच्या भ्रष्ट कारभाराला विटली आहे. या निवडणुकीत जनता भाजपला निश्चितच धडा शिकवेल.

- गिरीश चोडणकर, काँग्रेस नेते

Margao
Goa Extortion Case: खंडणी नव्हे, 'हायवे रॉबरी'; दिल्‍लीच्‍या व्‍यावसायिकांचा सुनियोजित पाठलाग, अनेक प्रश्न अनुत्तरीत

खूप विलंबानंतर का होईना; पण काँग्रेसने उमेदवारांचा निर्णय घेतला आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीपासून काँग्रेसचे सहयोगी म्हणून आम्ही रमाकांत खलप आणि विरियातो फर्नांडिस या दोन्ही उमेदवारांना मनापासून पाठिंबा देऊ. दुर्गादास कामत, सरचिटणीस,

गोवा फॉरवर्ड पक्ष

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com