Ponda News: आडपई साई मंदिरात जायांची पूजा

Ponda News: आडपई-दुर्भाट येथील श्री साई मंदिरात चौथ्‍या श्रावणी गुरुवारनिमित्त आज जायांची पूजा होणार आहे.
Ponda Sai Temple
Ponda Sai TempleDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Ponda: आडपई-दुर्भाट येथील श्री साई मंदिरात चौथ्‍या श्रावणी गुरुवारनिमित्त आज जायांची पूजा होणार आहे. यानिमित्त सकाळी 7 वाजता बाबांच्या मूर्तीस अभिषेक, आरती व तीर्थप्रसाद होईल. सकाळी 9 वाजता शिर्डीहून पादुकांचे आगमन होईल. यावेळी शिर्डीचे माजी ट्रस्टी गोपीनाथ कोते पाटील उपस्थित असतील.

Ponda Sai Temple
IRCTCसोबत प्लॅन करा शिर्डी-त्र्यंबकेश्वर-शनी शिंगणापूर टूर, कमी खर्चात भुवनेश्वर ते महाराष्ट्र दर्शन

दुपारी 1 वाजता माध्यान्ह आरती, तीर्थप्रसाद व महाप्रसाद होणार आहे. संध्याकाळी 6 ते रात्री 8 या वेळेत पिळर्ण-बार्देश येथील श्री गणेश सांस्कृतिक मंडळाचा कार्यक्रम, नंतर पालखी, महाआरती, तीर्थप्रसाद व महाप्रसाद होईल. या पूजेचे यजमानपद संतोष बांदोडकर व अनिल नाईक (दुर्भाट) भूषविणार आहेत. भाविकांनी उपस्‍थिती लावावी, असे आवाहन करण्‍यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Griha Aadhar Scheme
Goa Agriculture
Stray Cattle
Patto Bridge Security
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com