कुडचडे नगराध्यक्षपदी जास्मिन ब्रागांझा यांची बिनविरोध निवड

पालिकेवर कुडचडेचे आमदार नीलेश काब्राल यांची पकड मजबूत असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध
Jasmine Bragana elected as mayor of Curchorem Municipal Council
Jasmine Bragana elected as mayor of Curchorem Municipal Council
Published on
Updated on

कुडचडे : कुडचडे काकोडा नगरपालिकेच्या नगराध्यपदासाठी जास्मिन ब्रागांझा यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली आहे. यामुळे नगराध्यक्ष निवडीच्यावेळी बंडखोरी होईल अशी जी अटकळ व्यक्त केली जात होती तिलाही विराम मिळाला आहे.(Jasmine Bragana elected as mayor of Curchorem Municipal Council)

आज बुधवारी दुपारी 12 वाजेपर्यंत फक्त एकमेव अर्ज आल्याने जे विरोधक त्यांना विरोध करत होते त्यांचा बार फुसका ठरला असून या पालिकेवर कुडचडेचे आमदार नीलेश काब्राल यांची पकड मजबूत असून त्यांच्याविरोधात कुणीच जाऊ शकत नसल्याचे परत एकदा सिद्ध झाले आहे.

नगराध्यक्ष विश्वास सावंत देसाई यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने सदर पद रिक्त झाले होते. कुडचडे काकोडा नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदावरून बरेच राजकारण रंगले होते. नगराध्यक्ष पदाचा एकवर्षाचा कार्यकाळ संपल्याने करारानुसार विश्वास सावंत देसाई यांनी पायउतार झाले पाहिजे होते. पण सावंत देसाई यांनी पायउतार होण्यास नकार दिल्याने पालिकेतील अंतर्गत राजकारण उफाळून आले होते. आमदार नीलेश काब्राल यांनी नगरसेवकांची बैठक घेऊन पुढील नगराध्यक्ष म्हणून जास्मिन ब्रागांझा यांचे नाव पुढे केले होते पण ब्रागांझा यांना बऱ्याच नगरसेवकांनी पाठिंबा देण्यास आपला नकार दिला होता व यावरून नगराध्यक्षपदाची निवडणूक रंगतदार ठरणार असल्याचे चित्र दिसत होते.

Jasmine Bragana elected as mayor of Curchorem Municipal Council
कोलवाळ कारागृहाचा तुरुंगरक्षक ड्रग्ज घेऊन जाताना अटकेत

विरोधी गटातील नगरसेवक नगराध्यक्ष पदासाठी अर्ज भरणार असल्याचे सांगितले जात होते पण प्रत्यक्ष अर्ज भरण्याच्या दिवशी विरोधकांपैकी तसेच सत्ताधारी गटातील नगरसेवकांपैकी काब्राल यांच्या विरोधात जाण्याचे धाडस दाखवले नाही. विश्वास सावंत देसाई हे सुद्धा पूर्वी खुर्ची सोडण्यास तयार नव्हते, मात्र त्यांनीच आज ब्रागंझा यांच्याबरोबर जाऊन त्यांचा अर्ज सादर केल्याने नीलेश काब्राल यांची पालिकेवरील पकड किती मजबूत आहे ते दाखवून दिले आहे. बऱ्याच नगरसेवकांना ब्रागंझा यांची निवड खटकत असली तरी प्रत्यक्षपणे विरोध करण्यास कुणीच धाडस दाखवत नसल्याचे आज दिसून आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com