Japanese Tourist Fraud Case: पोलिस पथकास 50 हजारांचे बक्षीस; पर्यटनमंत्र्यांची घोषणा

पोलिसांच्या या कामगिरीची प्रशंसा करीत पर्यटन मंत्र्यांनी आज या प्रकरणाच्या तपास पथकास ५० हजारांचे बक्षीस जाहीर केले.
Rohan Khaunte
Rohan KhaunteDainik Gomantak
Published on
Updated on

Japanese Tourist Fraud Case: गोव्यात जपानी नागरिकाची एका टोळीने लुबाडणूक केली असता या संशयितांना तपासाअंती गोवा पोलिसांनी गजाआड केले आहे. अशावेळी पोलिसांच्या या कामगिरीची प्रशंसा करीत पर्यटन मंत्र्यांनी आज या प्रकरणाच्या तपास पथकास ५० हजारांचे बक्षीस जाहीर केले.

Rohan Khaunte
Curchorem Food Court : कुडचडेतील फूड कोर्टसाठी ‘इ निविदा’; पालिकेच्या बैठकीत निर्णय

बुधवारी (ता.२२) दुपारी पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांनी म्हापसा उपविभागीय पोलिस कार्यालयाचे प्रभारी उपअधीक्षक राजेश कुमार यांची भेट घेत या प्रकरणाचा आढावा घेतला. यावेळी हणजूण पोलीस निरीक्षक प्रशल नाईक देसाई हे कार्यालयात उपस्थित होते.

पर्यटन मंत्री खंवटे म्हणाले, एका जपान नागरिकाची लुबाडणूक झाल्यानंतर जपानकडून हणजूण परिसर हा पर्यटकांना असुरक्षित आहे, अशी कथित अ‍ॅडव्हायसरी काढण्यात आलेली. मात्र याप्रकरणी हणजूण पोलिस स्थानकात कुठलीच तक्रार दाखल नव्हती. परंतु सोशल मीडियावर त्या जपानी नागरिकाने केलेल्या ट्विटच्या सहाय्याने गोवा पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करीत संशयितांचा माग काढला.

गोवा हे पर्यटनस्थळ असल्याने पर्यटकांना सुरक्षिततेची भावना देणे आमचे कर्तव्य, त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणाच्या मुळाशी लवकरात लवकर जाण्याचा प्रयत्न केला. त्यानुसार गोवा पोलिसांनी या प्रकरणाचा योग्य तपास करून तिघांच्या मुसक्या आवळल्या. हणजूण पोलिस तसेच इतर अधिकाऱ्यांनी उत्तम कामगिरी बजावत विविध ठिकाणी आपले पथके पाठवून या संशयितांना अटक केल्याचे खंवटे म्हणाले.

या लुबाडणूक प्रकरणाविषयी पोलिसांकडून आज मी स्थितीचा आढावा घेतला. पोलिसांच्या कामगिरीवर मी समाधानी आहे. जपान नागरिकास गोवा पोलिसांनी न्याय मिळवून दिला असून यासाठी पोलीस अधीक्षक, उपअधीक्षक व हणजूण पोलिसांचे मी कौतुक करतो.

याशिवाय पर्यटन मंत्री या नात्याने संपूर्ण तपास टीमला मी ५० हजार रुपयांचे बक्षीस जाहीर करतो. जेणेकरून पोलिसांना प्रोत्साहन मिळावे. या प्रकरणातील संशयित हे गोमंतकीय नव्हते. पोलिसांकडून अशाप्रकारे पर्यटकांना ताबडतोब न्याय व दिलासा मिळाल्यास गोवा हे सुरक्षित पर्यटनस्थळ आहे, हा संदेश सर्वत्र पोहोचेल.

- रोहन खंवटे, पर्यटन मंत्री.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com