शालेय अभ्‍यासक्रमातील इतिहास अर्धवट :राजेंद्र आर्लेकर

या इतिहासासह आमचा पूर्वीचा इतिहास पुढील पिढीकडे हस्तांतरीत करण्याची जबाबदारी युवकांवर आहे.
Eduction

Eduction

Dainik Gomantak

Published on
Updated on

स्वातंत्र्यानंतरच्या महत्वाच्या घटनाही कधी ना कधी इतिहासजमा होणार आहेत. त्यामुळे या इतिहासासह आमचा पूर्वीचा इतिहास पुढील पिढीकडे हस्तांतरीत करण्याची जबाबदारी युवकांवर आहे. शालेय अभ्यासक्रमात (Eduction) जो इतिहास शिकवला जातोय तो अपूर्ण आहे, तो पूर्णपणे खरा नाही, अशी खंत हिमाचल प्रदेशचे राज्यपाल (Governor of Himachal Pradesh) राजेंद्र आर्लेकर (Rajendra Arlekar) यांनी व्‍यक्त केली.

गोव्याच्या (Goa) माहिती व प्रसिद्धी खात्याने ‘आझादी का अमृतमहोत्सव’ व गोवा मुक्तीचा हीरकमहोत्‍सव याचे औचित्‍य साधून आयोजित केलेल्‍या गोवा उत्सव व्याख्यानमालिकेत आर्लेकर बोलत होते. मडगावच्या रवींद्र भवन सभागृहात आयोजित या कार्यक्रमाला रवींद्र भवनाचे अध्यक्ष दामोदर नाईक, सदस्य सचिव संध्या कामत, माहिती व प्रसिद्धी खात्याचे अधिकारी प्रकाश नाईक उपस्थित होते. या व्याख्यानाला शालेय, उच्च माध्यमिक व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची मोठी उपस्‍थिती होती.

<div class="paragraphs"><p>Eduction</p></div>
महिलांच्या सबलीकरणासाठी झटले पाहिजे: भार्गवी चिरमुले

इतिहास हस्तांतरीत करण्याची जबाबदारी युवक उत्तम प्रकारे निभावू शकतात. सध्याचा युवक योग्य दिशेने विचार करीत असून त्याला केवळ मार्गदर्शन करण्याची आवश्यकता आहे. युवकांनी राष्ट्रवादी बनावे. राष्ट्रभक्तीची भावना त्यांच्या मन व हृदयात निरंतर असावी. गोव्याच्या स्वातंत्र्यानंतरच्या 60 वर्षांत युवकांमध्‍ये झालेली जागृती हीच काय ती आमची मिळकत आहे, असे आर्लेकर म्हणाले.

दामोदर नाईक म्‍हणाले, भारत व गोव्याची संस्कृती वेगळी नाही. अशा प्रकारची व्याख्याने वरचेवर होणे गरजेचे आहे. त्‍याद्वारे मिळणारी माहिती भविष्यात फायद्याची ठरेल. दरम्‍यान, प्रारंभी माहिती अधिकारी प्रकाश नाईक यांनी सर्वांचे स्वागत केले तर सिद्धेश सामंत यांनी सूत्रसंचालन करून शेवटी आभार मानले.

आमच्या या पूर्वीच्या पिढीने गोव्याचा इतिहास योग्य पद्धतीने आमच्यापुढे मांडला नाही. युवकांना खरा इतिहास सांगण्यात लाज ती का वाटावी? काही लोकांनी इतिहासाबद्दल भ्रम व गोंधळ निर्माण केला. केवळ 1510 नंतरचा इतिहास आमच्यापुढे प्रस्तुत केला. याचा अर्थ त्यापूर्वी गोवा अस्तित्वात नव्हता का? गोव्याच्या इतिहास हा कोट्यवधी वर्षांपूर्वींचा आहे. पोर्तुगीजांनी आमच्यावर हल्ला केला, अत्‍याचार केले ही वस्तुस्थिती आहे. ती का नाकारावी? असे सवाल आर्लेकर यांनी यावेळी उपस्‍थित केले.

ज्या भागात आपण राहतो त्याचा इतिहास, भूगोल जाणून घेणे गरजेचे आहे. ‘मी भारतीय आहे. सर्व भारतीय माझे बांधव आहेत’ याचा अर्थ समजणे व त्याचा साक्षात्कार होणे युवकांसाठी गरजेचे आहे. इतिहास युवकच पुढच्‍या पिढीला व्‍यवस्‍थित समजावून सांगू शकतात.

- राजेंद्र आर्लेकर, हिमाचल प्रदेशचे राज्‍यपाल

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com