Goa Haj: 'इस्लाम निष्पाप लोकांना मारण्याची परवानगी देत नाही', गोवा हज समितीकडून पहलगाम हल्ल्याचा निषेध

Goa Haj Committee: भारतील मुस्लिम समाज देशासोबत असून, पाकिस्तानविरोधात सरकार करेल त्या कारवाईला समर्थन असेल, असे उरफान मुल्ला म्हणाले.
Chairman Urfan Mulla In PC
Chairman Urfan Mulla In PCDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: 'इस्लाम निष्पाप लोकांना मारण्याची परवानगी देत नाही', असे म्हणत गोवा हज समितीने पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला. पहलगाम येथील घटना अमानवी आणि इस्लाम विरोधी असल्याचे मत समितीचे अध्यक्ष उरफान मुल्ला यांनी व्यक्त केले.

पहलगाम येथील कृत्य अमानवी असून इस्लाम व देशाच्या मूल्यांविरोधात आहे. यामुळे जगात चुकीचा संदेश गेला आहे. या कृत्याचा आम्ही कठोर शब्दात निषेध करतो, असे उरफान मुल्ला म्हणाले. भारतातील मुस्लिम समाज देशासोबत असून, पाकिस्तानविरोधात सरकार करेल त्या कारवाईला समर्थन असेल, असेही ते म्हणाले.

Chairman Urfan Mulla In PC
Goa News: 'ज्यांना मराठी हवी त्यांनी खुशाल महाराष्ट्रात जावं', कोकणी लेखक प्रकाश नाईक यांच्या विरोधात गुन्हा

कोणत्याही प्रकारचा दहशतवाद खपवून घेतला जाणार नाही. भारत या विरोधात कठोर प्रत्युत्तर देईल, असेही मुल्ला गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि माजी संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या आठवणींना उजाळा देताना म्हणाले. दहशतवाद संपविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना समितीने पूर्ण पाठिंबा असल्याचे मुल्ला म्हणाले.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरातून तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला जात आहे. भारताने कठोर पाऊले उचलत पाकिस्तानसोबतचा सिंधु जल वाटप पाणी करार स्थगित केला आहे. तसेच, वाघा सीमा बंद करण्यात आली आहे. याशिवाय देशातील पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्याचे आदेश दिले आहेत.

पाकिस्तानने देखील प्रत्युत्तर दाखल सिंधु करार स्थगित करणे युद्धाला आमंत्रण दिल्यासारखे असल्याचे म्हटले आहे. तसेच, पाकिस्तानमध्ये असलेल्या भारतीयांना देश सोडण्यास सांगितले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com