

पणजी: आंतरराष्ट्रीय स्तरावर खडतर शारीरिक क्षमतेची आणि मानसिक संयमाची परीक्षा घेणाऱ्या 'आयर्नमॅन ७०.३' (Ironman 70.3) ट्रायथलॉन (Triathlon) स्पर्धेचा थरार रविवार (दि.९) मिरामारमध्ये पार पडला. या स्पर्धेत ३१ देशांतील सुमारे १३०० ट्रायथलिट्सनी भाग घेतला. गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे संयुक्त सचिव संकेत आरसेकर यांनीही यशस्वीरीत्या ही स्पर्धा पूर्ण केली, ज्यामुळे प्रशासकीय पातळीवरील कर्मचाऱ्यांसाठी ते एक प्रेरणास्रोत ठरलेत.
मुख्यमंत्र्यांचे संयुक्त सचिव संकेत आरसेकर यांनीही या खडतर स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन यश मिळवले. १.९ किमी पोहणे, ९० किमी सायकलिंग आणि २१.१ किमी धावणे या तिहेरी आव्हानात्मक टप्प्यात त्यांनी आपली क्षमता आणि दृढनिश्चय सिद्ध केला. प्रशासकीय जबाबदारी सांभाळत त्यांनी फिटनेससाठी वेळ काढत ही स्पर्धा पूर्ण केल्यामुळे, ते गोव्यातील शासकीय कर्मचाऱ्यांसाठी एक प्रेरणा बनले आहेत.
या प्रतिष्ठेच्या स्पर्धेच्या पुरुष आणि महिला गटात अनुक्रमे उझबेकिस्तान आणि ब्रिटनच्या ॲथलीट्सनी अव्वल क्रमांक पटकावला:
पुरुष गट: कॉन्स्टीटन बेलोसोव्ह (Konstantin Belousov) - उझबेकिस्तान
महिला गट: एली गॅरेट (Ellie Garrett) - ब्रिटन
या स्पर्धेत सर्वात विशेष आणि अभिमानाची बाब म्हणजे भारतीय वायुदलाच्या संघाने केलेली अभूतपूर्व कामगिरी. स्पर्धेच्या सांघिकगटामध्ये भारतीय वायुदलाच्या तिन्ही संघांनी अत्यंत प्रभावी कामगिरी करत पहिले, दुसरे आणि तिसरे असे तिन्ही क्रमांक पटकावले.
या नेत्रदीपक कामगिरीमुळे भारतीय वायुदलाने जागतिक स्तरावर देशाचा दबदबा सिद्ध केला, तसेच देशातील तरुणांना फिटनेससाठी प्रेरित केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.