राष्ट्रीय स्पर्धा उद्‍घाटनासाठी पंतप्रधानांना आमंत्रण

गोव्यातच आयोजन : ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यावर ‘आयओए’चे शिक्कामोर्तब
Pm Modi warn BJP Leader
Pm Modi warn BJP LeaderDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

गोव्यातील 37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे उद्‍घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हावे, अशी राज्य सरकारची इच्छा आहे. त्यासंबंधी पंतप्रधान कार्यालयास निमंत्रण पाठविले असून त्यांच्या संमतीनंतर 25 किंवा 26 ऑक्टोबरला भव्यदिव्य स्पर्धेचा पडदा उघडला जाईल, अशी माहिती क्रीडामंत्री गोविंद गावडे यांनी शनिवारी ‘गोमन्तक’ला दिली.

भारतीय ऑलिंपिक संघटनेने (आयओए) शनिवारी नवी दिल्ली येथे झालेल्या विशेष सर्वसाधारण बैठकीत गोव्यातील स्पर्धेवर शिक्कामोर्तब केले.

Pm Modi warn BJP Leader
Goa Shigmotsav 2023 : ‘घणचे कटर घण’ ‘ओस्सय ओस्सय’ने पणजी दुमदुमली

स्पर्धा ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात घेण्यास आयओए आमसभेने मंजुरी दिली. त्यामुळे राज्यात वारंवार लांबलेल्या या प्रतिष्ठेच्या स्पर्धा आयोजनावर मोहोर उमटली आहे.

क्रीडामंत्री गावडे म्हणाले, ‘‘राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या उद्‍घाटनासाठी पंतप्रधान उपस्थित राहावेत, यासाठी आम्ही निमंत्रण पाठविले आहे. त्यांच्याकडून पंधरवड्यात संमतीपत्र अपेक्षित आहे. त्यानंतर लगेच स्पर्धा उद्‍घाटनाची तारीख जाहीर केली जाईल. 25 किंवा 26 ऑक्टोबरला स्पर्धेस सुरुवात होऊ शकते.’’

...ही गोमंतकीयांची स्वप्नपूर्ती

गोव्यात राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा होणे ही समस्त गोमंतकीयांची स्वप्नपूर्ती असल्याची उत्स्फूर्त प्रतिक्रिया क्रीडामंत्री गावडे यांनी दिली. ते म्हणाले, ‘‘गेल्या वर्षी मंत्री या नात्याने मी क्रीडा मंत्रालयाचा ताबा घेतला. 2023 मध्ये राष्ट्रीय स्पर्धा गोव्याचे घेण्याचे ध्येय बाळगले. आयओएने आता हिरवा कंदील दाखविल्यामुळे मार्ग मोकळा झाला.

स्पर्धा आयोजनाची प्रक्रिया

  • मार्चच्या पहिल्या आठवड्यात गोव्याच्या तयारीची पाहणी केल्यानंतर आयओए शिष्टमंडळ समाधानी, सज्ज असल्याची माहिती

  • 15 एप्रिल रोजी स्पर्धा बोधचिन्हाचे, त्यानंतर अनुक्रमे स्पर्धा गीत, शुभंकराचे अनावरण

  • सध्या एकूण 37 प्रमुख खेळांना आयओएची मंजुरी, बाकी खेळांविषयी निर्णय नंतर

  • चतुर्थीपासून प्रत्येक तालुक्यात, शालेय पातळीवर स्पर्धेविषयी जनजागृती करण्याचे राज्य सरकारचे नियोजन

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Narendra Modi 25 years in government
PM Narendra Modi Birthday Wishes Times Square Billboard
PM Modi Digital India New Chapter
Goa Olympic Association election
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com